Home मराठवाडा कोरोना सारखा इतर रोगाची लागणहोऊ नये म्हणून बदनापूर शहरातील मातोश्री हॉस्पिटलने राखले...

कोरोना सारखा इतर रोगाची लागणहोऊ नये म्हणून बदनापूर शहरातील मातोश्री हॉस्पिटलने राखले रुग्नांमध्ये अंतर

82
0

बदनापूर – सय्यद नजाकत

जालना – कोरोना रोगाव फैलाव होवू नये म्हणून शासन विविध उपाययोजना करीत असून नागरिकांना देखील दक्षता बाळगण्याचे आव्हान नगर पंचायत मार्फत करण्यात आलेले आहे,तर डॉक्टरांनी देखील शासनाच्या सूचनांचे पालन सुरु केले असून मातोश्री हॉस्पिटलमध्ये रुग्णांमध्ये अंतर राखले जात असून इतर दवाखाण्यात देखील अश्याच पद्धतीने रुग्णांमध्ये अंतर ठेवल्यास रोगराई पसरणार नाही असे मत व्यक्त केले जात आहे
सध्या कोरोना रोगामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले असून सदर रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून शासनाने गर्दी न करण्याचे आव्हान केलेले आहे तसेच तोंडाला मास्क,हात सिंटायझर ने धुणे आदी सूचना दिलेल्या आहेत, रोग एक दुसऱ्यांच्या संपर्कात आल्याने वाढत जातो अशी धारणा अनेकांची असल्याने बोलतांना देखील अंतर ठेऊन बोलावे असे सूचित करण्यात आले आहे त्यामुळे स्वतःचे रक्षण स्वतः करावे असे म्हंटले जात आहे,बदनापूर तहसीलदार छ्या पवार,नगर पंचायतच्यावतीने मुख्य अधिकारी डॉ.पल्लवी अंभोरे,अभियंता गणेश ठुबे,पोलीस निरीक्षक एम.बी.खेडकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.योगेश सोळुंके आदींनी नागरिकांना आव्हान केले आहे.
जस एक दुसऱ्यांमध्ये अंतर राखणे गरजेचे आहे तसं सध्या दवाखाण्यात विविध रुग्ण येत आहे मात्र दवाखान्यात रुग्णांमध्ये कोणतेच अंतर राखले जात नाही बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी रुग्ण येऊन बसतात आणि नंतर एक एक करून डॉक्टर कक्षेमध्ये तपासणी केली जाते त्यामुळे दवाखान्यात रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांना देखील इतर रोगाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून बदनापूर येथील मातोश्री हॉस्पिटलचे डॉ.अरुण खैरे व डॉ.अस्मिता खैरे यांनी दवाखाण्यात येणाऱ्या रुग्नांमध्ये अंतर ठेवण्यासाठी व्यवस्था केली असून आलेले रुग्ण एक मेकापासून दोन फूट अंतर राखून बसविले जात आहे त्यामुळे रोगराई पसरण्यास आळा बसणार आहे अश्याच पद्धतीने इतर दवाखान्यात देखील अंतर उपक्रम राबवावा अशी इच्छा व्यक्त केली जात आहे .

Unlimited Reseller Hosting