Home मराठवाडा गोळीबाराने नांदेड पुन्हा हादरले. एक ठार , दोघे गंभीर जखमी

गोळीबाराने नांदेड पुन्हा हादरले. एक ठार , दोघे गंभीर जखमी

19
0

नांदेड, दि.२६ ; ( राजेश भांगे ) –
राज्यात कोरोनाची धास्ती असतानाच आज भर दुपारी झालेल्या गोळीबाराने नांदेड शहर पुन्हा हादरले. झालेल्या गोळीबारात एक जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा थरार आज दिनांक २५ रोजी घडला.
देगलूर नाका भागातील खुदबेई नगर चौकात आली जर्दावाला आणि गौस इनामदार यांच्यात सकाळी वाद झाला होता. हा वाद तात्पुरता मिटल्यानंतर दुपारी पुन्हा वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात अली जर्देवाला याचा भाऊ महमद जुनेद (वय ३०) हा जागीच ठार झाला. तर दुसरा भाऊ महमद हाजी याच्या पाठीत दोन गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला. यावेळी अली जर्दावाले यांनीही बचावासाठी गोळीबार केला. यात गौस इनामदार हा गंभीर जखमी झाला. या हाणामारीत तलवार आणि पिस्तुलाचा सर्रास वापर करण्यात आला. भरदुपारी घडलेल्या थरारणे नांदेड शहर हादरले. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी (इतवारा) धनंजय पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) अभिजीत फस्के, इतवारा ठाण्याचे पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे, नांदेड ग्रामिणचे पंडीत कच्छवे, स्थानिक गुन्हे शाखेचे द्वारकादास चिखलीकर यांनी भेट दिली.
अली जर्देवाला आणि गैस इनामदार यांच्यात जागेचा वाद गेल्या अनेक वर्षंपासून सुरू आहे. या वादातून दोघात अनेकवेळा हाणामारी झाल्या आहेत. विविध कारणावरून दोघांविरुद्ध इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल आहेत. आज झालेल्या वादातून एकाचा बळी गेला असून दोघे अत्यवस्थ आसल्याचे सांगण्यात आले.