Home मराठवाडा छत्रपती हॉस्पीटल यांच्या मार्फत पोलिस कर्मचारी यांना मास्कचे वाटप ,

छत्रपती हॉस्पीटल यांच्या मार्फत पोलिस कर्मचारी यांना मास्कचे वाटप ,

9
0

छत्रपती हॉस्पीटल यांच्या मार्फत प

सय्यद नजाकत ,

बदनापूर/प्रतिनिधी

कोराना रोगा पासुन आपले स्वतःचे सरंक्षण होण्यासाठी मंगळवार रोजी शहरातील छत्रपती हॉस्पीटल यांच्या मार्फत पोलिस कर्मचारी यांना मास्कचे वाटप करण्यात आले.

सध्या सर्वत्र कोरोना रोगामुळे सर्वजण त्रस्त असतांना जनतेची काळजी घेण्याचे कार्य पोलीस,डॉक्टर,नर्स आदी करीत आहे,या रोगाची लागण होऊ नये म्हणून नागरिकांना घराबाहेर येऊ नका म्हणून विनंती केली जात आहे व पोलीस मात्र रस्त्यावर उभे राहत असल्याने त्यांची काळजी घेणे आवश्यक असल्याने शहरातील छत्रपती हॉस्पिटलच्या वतीने पोलीस कर्मचारी व अधिकारीना मास्क वाटप करण्यात आले

यावेळी पोलिस निरिक्षक मारूती खेडकर , एपीआय भिमाळे ,साह्यक फौजदार शेख इब्राहिम , किशोर पुगळे, शिवाजी भगत , चंद्रशेखर मांन्टे , शेख इस्माईल , अंभोरे , देशमुख , काळूसे, पठान , मोरे , ढिल्पे, ठाकुर , चरणसिंग ब्राम्हणवत ,जारवाल, खंडागळे, महिला कर्मचारी कल्याणी मॅडम, खरात मॅडम व जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाउपाध्यक्ष सय्यद रफिक , शेख यकीन , समीर खान , शेख वाजीद उपस्थित होते