Home महत्वाची बातमी जनता कर्फ्युच्या दिवशी औषध निर्माण अधिकारी गैरहजर!तालुका आरोग्य अधिकारी यांनी केले कार्यमुक्त!

जनता कर्फ्युच्या दिवशी औषध निर्माण अधिकारी गैरहजर!तालुका आरोग्य अधिकारी यांनी केले कार्यमुक्त!

167
0

अंढेरा प्राथमिक आरोग्या केंद्रातील प्रकार……….

रवी अण्णा जाधव

देऊळगाव मही

अंढेरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असुन या प्राथमिक आरोग्य केंद्रात अंढेरा गावासह सेवानगर,पिप्री आंधळे,मेंडगाव,बायगाव,शिवणी आरमाळ,पाडळी शिंदे आंचरवाडी,रामनगर येथुन गोर गरिब रुग्ण उपचार घेण्यासाठी मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात.सध्या सगळीकडे कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला असुन चीन,अमेरिका सारखे देश सुध्दा कोरोनाच्या व्हायरसने ग्रासले असुन भारतात सुध्दा कोरोना व्हायरसचा शिरकाव हळुहळु वाढु लागला असुन दिल्ली ते गल्ली पर्यत सगळीकडेच आरोग्य विभाग अहोराञ उपचारासाठी मेहनत घेत असुन काल दि.२२मार्च रोजी जनता कर्फ्युच्या दिवशी प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध निर्माण अधिकारी अरुण राजपुत गैरहजर असल्यामुळे तालुका आरोग्य अधिकारी डाँ.दत्ता मांटे यांनी एका पञाव्दारे कार्यवाही करत कार्यमुक्त केले.
भारतातील प्रमुख राज्य तसेच महत्त्वाचे शहरे हे लाँकडाऊनच्या दिशेने जात असुन महाराष्ट्रात सुध्दा खबरदारी म्हणुन शाळा,महाविद्यालये,सरकारी आँफीसे,माँ.सिनेमा घरे हे एकत्तीस मार्च पर्यत बंद केले असुन राज्यात कलम १४४ लागु केले आहे.
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुंख्यमंञी उध्दव ठाकरे यांनी सध्या कोरोना वायरसने सगळीकडे थैमान घातलेले असुन संपुर्ण भारतदेश कोरोना वायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत असतानां भारताचे माननिय प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधताना करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं होतं. त्याला सगळीकडे चांगला प्रतिसाद मिळाला असुन सर्वानी आपआपली दुकाने,हाँटेल्स,हे बंद ठेवली होती.
अत्यावश्यक असणरी आरोग्य सेवा चोवीस तास सुरु असुन काल जनता कर्फ्यु असतानां आरोग्य विभागाचे डाँक्टर,परिचारीका हे कर्तव्यावर हजर होते.अंढेरासह जवळपास मुंबई,पुणे,तसेच परराज्यात काम करणारे माणसे हे गावाकडे येत असुन त्यांनी स्थानिक ग्रामपंचायतला माहीती देणे आवश्यक असुन त्यांची प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करणे गरजेचे आहे.अशा परिस्थितीत प्राथमीक आरोग्य केंद्र अंढेरा येथील औषध निर्माण अधिकारी अरुण राजपुत हे”जनता कर्फ्युच्या दिवशी” गैरहजर असल्यामुळे राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तसेच साथरोग प्रतिबंध कायदा लागु असतानां कुठलीही पूर्वसुचना न देता आपल्या कर्तव्यावर गैरहजर असणाऱ्या औषध निर्माण अधिकारी अरुण राजपुतला तालुका आरोग्य अधिकारी डाँ.दत्ता मांटे यांनी एका पञाद्वारे कार्यवाही करत जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.बुलढाणा यांच्याकडे कार्यमुक्त केले आहे.तरी जिल्हा आरोग्य अधीकारी या कामचुकार अधिकाऱ्यांवर काय कार्यवाही करतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

“संपुर्ण राज्यात साथरोग प्रतिबंध कायदा लागु असुन कोरोना व्हायरसच्या लढ्यासाठी आरोग्य विभाग अहोराञ मेहनत घेत असुन जनता कर्फ्युच्या दिवशी गैरहजर असणाऱ्या औषध निर्माण अधिकाऱ्यांला पञाद्वारे तात्काळ कार्यमुक्त करण्यात येत आहे!
डाँ.दत्ता मांटे
तालुका आरोग्य अधिकारी देऊळगाव राजा

Previous articleअंढेरा प्राथमिक आरोग्या केंद्रातील प्रकार………. जनता कर्फ्युच्या दिवशी औषध निर्माण अधिकारी गैरहजर!तालुका आरोग्य अधिकारी यांनी केले कार्यमुक्त!
Next articleछत्रपती हॉस्पीटल यांच्या मार्फत पोलिस कर्मचारी यांना मास्कचे वाटप ,
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here