Home महत्वाची बातमी
67
0

कोठली खुर्द गावांतील गावकऱ्यांचा कर्फ्युला उस्फुर्त प्रतिसाद ,

*जीवन महाजन*
*प्रतीक्षा पाटील ,*

कोठली खुर्द गावात देखील नागरिकांनी जनता कर्फ्युला उस्फुर्त प्रतिसाद देत कोरोनाचा संसर्ग टाळण्याची खबरदारी घेत करोनाला दुर सारण्यासाठी एकजुट दाखविल्याचे आज कोठली गावात दिसून आले.
गावातील जनता घरातच असल्याचे दिसून आले.सकाळी 7 वाजेपासून गावातील सर्वच रस्त्यांवर चिटपाखरूही नव्हते. गावातील सर्वच दुकाने बाजारपेठ स्वयं स्फूर्तीने बंद होते किरकोळ मेडिकल दुकाने व दवाखाणे देखील सर्वच व्यवहार बंद होते व शुकशुकाट पहावयास मिळाला जनतेने संचार बंदी स्वतःहून पाळली आहे, यावरून जनता कोरोनविषयी आता खुपच गंभीर झाल्याचे स्पष्ट होते.

*जिवन महाजन सह प्रतीक्षा पाटील*
*कोठली खुर्द* *नंदुरबार*