Home महत्वाची बातमी स्वच्छता पाळा आणि कोरीना मुक्त व्हावा _शरद जोगी

स्वच्छता पाळा आणि कोरीना मुक्त व्हावा _शरद जोगी

68
0

*स्वच्छता पाळा आणि कोरीना मुक्त व्हावा* _शरद जोगी

कोरपना :- मनोज गोरे

कोरोना या बिमारीने सध्यास्थितीत जागतिक स्तरावर या बिमारीने थैमान घातले असून पुष्कळ लोक दगावली आहे आणि बरेच रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी भरती सुद्धा आहे त्यामुळे जनतेत भीतीचे वातावरण निमार्ण झालेले आहे. अश्या परिस्तिथीत गडचांदूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष शरद जोगी आणि नगरसेविका अश्विनी कांबळे यांनी आपल्या पुढाकाराने आपल्या जीवाची सुध्दा पर्वा न करता दारोदारी लोकांच्या गर्दीत जाऊन कोरोना या बिमारी बद्दल लोकांना माहिती देऊन या रोगांवर उपाय योजना म्हणून त्यांनी प्रत्येकांच्या घरोघर जाऊन कुंटुबातील सर्वंच सदस्याला कोरोना विषाणूचा शिरकाव न होण्यासाठी प्रत्येकांना एक मास्क, हाथ स्वच्छ धुण्याकरिता सॅनिटाईजर हॅण्ड वॉश विनामूल्य देण्यात आले. भिऊ नका स्वच्छता पाळा सतर्क रहा निरोगी रहा एकजुटीने सहकार्य करा या रोगावर मात करा. असा संदेश त्यांनी दिला.
स्वतःताची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्यावी यासाठी हिमतीने लढा देऊन आपल्या गावाला कोरीना मुक्त करूया असे त्यांनी जनतेला सांगितले.
यावेळी समाजाच्या हितासाठी नेहमी धावणारे विनोद हरणे यांनी सुद्धा आपले योगदान देऊन जनजागृती करून या छोट्याश्या उपक्रमात भाग घेतला.
तसेच या प्रभागातील दिवाकर भगत, दिलीप खैरे, ओमप्रकाश किचेकर, आदेश ढोंगळे, ऋषिकेश भरती, निर्भय शेरकी रोहन कुलसंगे, दर्शन हरणे आणि लहान चिमुकल्यानी सुद्धा आपला सहभाग घेऊन उपक्रम यशस्वी करण्यास आपले योगदान दिले.