Home जळगाव सोशल मीडियावर मुस्लिम समाजाच्या भावना दुखवनाऱ्यावर कारवाई करा….

सोशल मीडियावर मुस्लिम समाजाच्या भावना दुखवनाऱ्यावर कारवाई करा….

82
0

_पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मांगणी_

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यातील
बोदवड शहरातील
सोशल मीडियाच्या माध्यमातून गौरव माळी या नावाच्या फेसबुक खात्यावरून इस्लाम धर्माला मानणाऱ्या लोकांच्या भावना दुखवनारी पोस्ट शेअर केली आहे. त्यात इस्लाम धर्माचा पवित्र धर्मग्रंथाची बदनामी ची पोस्ट व्हायरल केली आहे त्याविरुद्ध कारवाई करावे अश्या मांगणीचे निवेदन दि.२० रोजी मुस्लिम समाजाकडून पोलीस उपनिरीक्षक भाईदास मालाचे यांना दिले.
गौरव माळी हा त्याच्या फेसबुक अकाऊंट वरून वारंवार धार्मिक भावना भडकवणारे पोस्ट करत असतो तरी बोदवड शहरात सर्व जाती धर्माचे लोक गुना गोविंदाने एकत्र नांदतात व हा गौरव माळी अश्या धार्मिक भावना भडकविण्याच्या पोस्ट वारंवार करतो व समाजात जातीय तेढ निर्माण करत असल्याने गौरव माळी याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या मांगणीचे निवेदन बोदवड येथील मुस्लिम समाजाकडून पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले.