Home जळगाव होय आमचे समर्थन जनता कर्फ्यू ला मुस्लिम मंच ७९ व्या दिवशीही कर्फ्यू...

होय आमचे समर्थन जनता कर्फ्यू ला मुस्लिम मंच ७९ व्या दिवशीही कर्फ्यू धरणे आंदोलन सुरूच सोमवारपासून आंदोलकांनी येऊ नये -मुस्लिम मंच चे आवाहन ,

86
0

*होय आमचे समर्थन जनता कर्फ्यू ला*- मुस्लिम मंच
*७९ व्या दिवशीही कर्फ्यू धरणे आंदोलन सुरूच*
*सोमवारपासून आंदोलकांनी येऊ नये -मुस्लिम मंच चे आवाहन*
रावेर (शरीफ शेख)
जळगाव मुस्लिम मंच तर्फे सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा शनिवार ७९ वा दिवस या आंदोलनास शुक्रवारपासून कर्फ्यू धरणे आंदोलन संबोधले गेले असून आंदोलनस्थळी फक्त पाच महिला किंवा पुरुष बसलेले असतात त्यामुळे मंच चे समन्वयक फारुक शेख यांनी आव्हान केलेले आहे की सोमवारपासून आंदोलनस्थळी कोणीही येता कमा नये मंच चे सहकारी हे धरणे सुरु ठेवतील
तसेच आज रविवारी होणाऱ्या जनता कर्फ़्यू मध्ये सर्वानी सहभाग नोंदवून १४ तास आपल्या घरीच थांबवावे व माननीय पंतप्रधान यांच्या आव्हानास प्रतिसाद द्यावा असे सुद्धा आवाहन फारूक शेख यांनी केलेले आहे
*महिलांची विनंती आन्दोलनाची*
सोमवार पासून आम्ही फक्त पाच महिला या आंदोलनात सामिल राहु कोणीही पुरुषांनी यात समाविष्ट होउ नए व त्यांनी घरी थांबावे असे महिला आंदोलकांनी मंच कड़े विनंती केलेली आहे परंतु मंच चे फारूक शेख यांनी त्यांचे आभार मानून ती विनती अमान्य केली.
*आन्दोलक आले सही केली व गेले*
यावेळी आंदोलन स्थळी काही आंदोलकांनी येऊन आपल्या स्वाक्षऱ्या केल्या त्यात प्रामुख्याने गफ्फार मालिक, करीम सालार, डॉक्टर इक्बाल शाह, डॉक्टर एम एकबाल, एडवोकेट इरफान पठाण, खलील टेलर ,डॉक्टर अमानुल्ला शाह, डॉक्टर जबी शाह , अन्वर पिंजारी, अन्वर सीखलीगर ,मोहसीन अमीर शेख, शकील पिंजारी, शेख अमीर इब्राहीम, आसिफ देशपांडे, शेख ताहेर ,लईक अहमद, शेख रफिक करीम ,शेख रईस जैनुद्दीन, अब्दुल बसिद, मंसूर खान, नजमा शेख ,रुबीना शेख, शबीना हरीश, फर्जाना आयुब, सुलतान सय्यद, शेख जावेद, अरसतूल बी मजिद, नजमा यूसुफ, जावेद शेख, आदींनी येऊन आपल्या स्वाक्षऱ्या केल्या व पाठिंबा देऊन निघुन गेले.
शनिवार शासकीय कार्यालय बंद असल्याने निवेदन देण्यात आले नाही.