Home माहिती व तंत्रज्ञान करोना व्हायरसमुळे दोन कोटी ५० लाख नोकऱ्यांवर येणार गदा

करोना व्हायरसमुळे दोन कोटी ५० लाख नोकऱ्यांवर येणार गदा

17
0

राजेश भांगे

सध्या संपूर्ण जगासमोर करोना व्हायरसने मोठे आव्हान निर्माण केले आहे. रोजच्या वाढत्या रुग्ण संख्येबरोबरच या विषाणूमुळे आर्थिक प्रगतीला मोठी खीळ बसली आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला आहे तसेच काही कंपन्यांनी आपले उत्पादन सुद्धा बंद ठेवले आहे. या करोना व्हायरसमुळे जगातील दोन कोटी ५० लाख नोकऱ्यांवर गदा येऊ शकते.
योग्य आंतरराष्ट्रीय समन्वय आणि धोरणात्मक उपायोजना केल्या तर बेरोजगारीचा हा आकडा कमी करता येईल असे संयुक्त राष्ट्राच्या संस्थेने म्हटले आहे. “COVID-19 अँड वर्ल्ड ऑफ वर्क: इम्पॅक्ट अँड रिसपॉन्सेस” या प्राथमिक विश्लेषण अहवालामध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने कामाच्या ठिकाणी कामागारांना बचावासाठी योग्य सुविधा, अर्थव्यवस्था आणि रोजगाराला चालना देण्याची मागणी केली आहे.
समाजिक संरक्षण, नोकरी टिकवून ठेवण्याला प्राधान्य आणि छोटया-मध्यम आकाराच्या कंपन्यांना कर सवलत द्यावी अशी मागणी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने केली आहे. आर्थिक धोरणात्मक उपायोजना आणि काही ठराविक आर्थिक क्षेत्रांना आर्थिक मदत करावी असे प्रस्ताव दिले आहेत. २००८ साली जगात आर्थिक मंदी आल्यानंतर आंतरराष्ट्रीय समन्वयातून ज्या धोरणात्मक उपायोजना करण्यात आल्या, त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण कमी झाले त्याचा दाखला या अहवालात देण्यात आला आहे.