Home मराठवाडा औरंगाबाद चे सुपुत्र, उर्दू चे प्रख्यात लेखक ‘नूर उल हसनैन’ यांना अंतरराष्ट्रीय पारितोषिक घोषित.

औरंगाबाद चे सुपुत्र, उर्दू चे प्रख्यात लेखक ‘नूर उल हसनैन’ यांना अंतरराष्ट्रीय पारितोषिक घोषित.

63
0

अब्दुल कय्युम

औरंगाबाद. १८ मार्च २०२०. या वर्षी २४ व्या जागतिक उर्दू साहित्य पुरस्कार दोहा कतार यांच्या मार्फत २०२० चा पुरस्कार हे औरंगाबाद चे सुपुत्र, साहित्यिक, पत्रकार, उर्दू चे प्रख्यात लेखक ‘नूर उल हसनैन’ यांना नुकताच नवी दिल्ली येथे झालेल्या जेउरी च्या बैठकीनंतर जाहीर झाला. या पुरस्कारांमध्ये त्यांना प्रशस्ती पत्र. कांस्य पदक व दीड लाख रुपये रोख रकम मिळणार असून औरंगाबाद शहरासाठी हि प्रतिष्टेची बाब आहे. या पुरस्काराच्या जेउरी मंडळाच्या अध्यक्षस्थानी पद्मभूषण प्राध्यापक गोपीचंद नारंग हे असून त्यांनी या प्रसंगी असे सांगितले कि ‘नूर उल हसनैन’ यांचा समावेश अंतरराष्ट्रीय स्तरावर आजच्या घडीला महत्वपूर्ण स्तंभ लेखक, साहित्यिक व कथाकारामध्ये समावेश केला जातो. जेउरी च्या सदस्यांमध्ये प्रा. शफए खिदवाई, शिन. काफ. निझाम अणि हक्कानी अल कास्मी हे होते. तसेच समन्वयक म्हणून किफायत दहेलवी आणी सहायक मो. मुसा रजा उपस्थित होते. लहान पण पासूनच त्यांना कथा लिहण्याचा व्यासंग होता. त्यांची प्रथम कथा “इन्सानियत” दैनिक हिंदुस्थान मध्ये ज्या वेळेस ते फक्त ७ वी वर्गा मध्ये होते. त्या पासून आज पर्यंत त्यांनी शेकडो कथा लिहले आहेत. ‘नूर उल हसनैन’ यांनी जास्तीतजास्त समाजी, राजकीय, व सांस्कृतिक कथा लिहले आहेत. त्यांचे आज पर्यंत ४ कथांचे पुस्तके प्रकाशित झाले आहेत ज्या मध्ये सिमटते दायरे – १९८५, मोर रक्स और तमाशाई – १९८८, गढी मे उतरती शाम – १९९९, फक्त बयान ताक – २०१२ यांचा समावेश आहे. यांनी सामाजिक, ऐतिहासिक सांस्कृतिक नॉवेल / कादंबरी देखील लिहले आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये अहंकार – २००५, ऐवानो के काबिदा चिराग – २०१३, चांद हमसे बाते करता है – २०१५, तीलकुल अय्याम – २०१८ चा समावेश आहे. नया अफसाना नये नाम (दोन खंडा मध्ये) आणी उर्दू नॉवेल : कल और आज च्या नावाने समीक्षापर दोन निबंधांचे संग्रह प्रकाशित केले आहे. या व्यतिरिक्त खुश बायानीया (खाके), गुड्डू मिया, चौथा शहजादा (मुलांकरिता कथा) प्रकाशित झाले आहेत. नूर उल हसनैन यांना विविध पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहेत ज्या मध्ये महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी च्या वतीने त्यांच्या विविध पुस्तकांना पाच वेळेस सन्मानित करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश साहित्य अकादमीच्या वतीने त्यांनी तीन वेळेस सन्मानित करण्यात आले आहे. चौधरी चरण सिंग विद्यापीठ मेरठ द्वारे त्यांना फिक्शन साठी ‘मंझर काझमी राष्ट्रीय पुरस्कार २०१७’ त्यांना प्रदान करण्यात आले होते. आता पर्यंत देशातील ९ विविध विद्यापीठात त्यांच्या कथा व कादंबऱ्यांवर संशोधकांनी एम. फिल. व पी. एच. डी. चे आपले शोध निबंध सदर केले आहेत. मजलिस ए फरोग ए उर्दू अदब दोहा कतर यांच्या कडून साहित्यातील दिला जाणारा हा पुरस्कार दार वर्षी एक भारतीय व एक पाकिस्तानी लेखकाला दिला जातो. भारतीय पुरस्कार प्राप्त लोकांमध्ये आल अहमद सरवर, खुर्रत उल एन हैदर, जिलानी बानो, कालिदास गुप्ता रजा, जोगेंद्र पॉल, सुरेंद्र प्रकाश, निसार अहमद फारूक, सय्यदा जाफर, जावेद अख्तर, अब्दुल समद, गुलझार, रतन सिंग, शामूएल अहमद, मुशर्रफ आलम जौकी, नंदकिशोर विक्रम, सय्यद मोहम्मद अशरफ व फे. सिन. एजाज यांचा या मध्ये समावेश आहे. हा पुरस्कार २४ वर्ष पूर्वी ‘आलम ए फरोग ए उर्दू अदब’ चे संस्थापक मुसेब उर रहमान यांनी सुरु केला होता. हे पुरस्कार येत्या ऑक्टोबर २०२० मध्ये दोहा कतर येथे विविध देशांचे राजदूत, दूतावास, प्रतिष्टीत नागरिक, लेखक, कवी, समीक्षक आणी हजारो च्या संख्येने उपस्थित उर्दू प्रेमींच्या साक्षीने ‘नूर उल हसनैन’ यांना प्रदान करण्यात येईल.