Home मराठवाडा कोरोना वायरस- समाजसेवक मुसा खान यांच्या तर्फे मास्क वाटप.

कोरोना वायरस- समाजसेवक मुसा खान यांच्या तर्फे मास्क वाटप.

25
0

वाहतूक पोलिसांना व नागरिकांना केले वाटप

अब्दुल कय्युम

औरंगाबाद (प्रतिनिधी ) समाजसेवक मुसा खान यांनी शहर वाहतूक पोलीसांना व रेल्वेस्टेशन परिसर, मुख्य बसस्थानकावर, जाऊन कोरोना विषाणू संसर्ग रोगापासून कस बचाव कराव याबद्दल माहिती देवून शहर वाहतूक पोलीसांना मास्क लावून जनजागरण करतांना तसेच आटो चालकांना, बस चालकांना, काळीपिवळी चालकांना तोंडाला मास लावून जणजागरण केले. आपली सुरक्षा व आपल्या परिवाराची सुरक्षा महत्वाचे आहे हे पटवून दिले कोरोना या विषाणूला रोखण्यासाठी औरंगाबाद येथील समाजसेवक मुसा खान यांनी दुपारी रेल्वेस्टेशन परिसरातील वाहतूक पोलिसांना कोरोना व्हायरसपासून बाचव करण्यासाठी पोलिसांना मास्क वाटप करण्यात आले. जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूने औरंगाबाद मध्ये शिरकाव केला आहे. औरंगाबाद मध्ये एका महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला आहे पुढे लोकांना होऊ नये यासाठी समाजसेवक मुसाखान यांनी आज तोंडाला लावणारे मास्क वाटप केले आहे. आणि लोकांनी कोरोना या विषाणूने घाबरण्याची गरज नाही फक्त सावधान राहून गर्दीत जाणे टाळावे व मास्क लावून बाहेर तसेच सेनिटॉयजर चा वापर करावा, हाथ चांगले धुवावेत, खोकला छिंक करणाऱ्या पासून एक ते दोन मिटर लांब रहावे. पडावे सुरक्षा बाळगावी असे आव्हान मुसा खान यांनी केले आहे.

Unlimited Reseller Hosting