Home महत्वाची बातमी परिवहनेत्तर दुचाकीसाठी नवीन क्रमांक मालिका

परिवहनेत्तर दुचाकीसाठी नवीन क्रमांक मालिका

155

औरंगाबाद, दिनांक 17 : परिवहनेत्तर दुचाकी वाहनांसाठी नोंदणी मालिका एम एच 20 एफ एन ही सद्यस्थितीत सुरू आहे. या मालिकेतील क्रमांकाचे वाटप संपत आलेले आहे. त्या अनुषंगाने परिवहनेत्तर दुचाकी वाहनांसाठी एम एच 20 एफ क्यु 1 ते 9999 ही मालिका 23 मार्च 2020 पासून सुरू करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

ज्या वाहनधारकांना पसंतीचा नोंदणी क्रमांक घ्यावयाचा असेल त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज, सदरील आकर्षक क्रमांकाला लागू असलेली फी च्या रकमेचा धनाकर्ष प्रादेशिक परिवहन कार्यालय, औरंगाबाद यांच्या नावे व ओळखपत्राच्या सांक्षांकीत प्रतीसह 23 मार्च 2020 रोजी दुपारी 2 पर्यंत परिवहनेत्तर शाखेतील खिडकी क्र. 16 वर जमा करावा. या मालिकेतील आकर्षक क्रमांकाचे वाटप महाराष्ट्र मोटार वाहन नियम व परिवहन आयुक्तांच्या परिपत्रकानुसार करण्यात येईल. एकाच आकर्षक क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास अशा अर्जदारांनी दुसऱ्या कामाचे दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत बंद लिफाफ्यामध्ये मुळ शुल्काव्यतिरिक्त अधिक रकमेचा धनाकर्ष जमा केल्यानंतर लिलावाची विहित कार्यपद्धती अवलंबून नोंदणी क्रमांकाचे वाटप करण्यात येईल, याची वाहनधारकांनी नोंद घ्यावी, असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.