महत्वाची बातमी

माजी सैनिकांना धनादेश वाटप

Advertisements

अब्दुल कय्युम

औरंगाबाद, दिनांक 17 : महाराष्ट्र शासनामार्फत माजी सैनिकांना स्वयंरोजगारांतर्गत आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत आज औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय, यांच्या हस्ते जिल्ह्यातील चार माजी सैनिकांना एकूण रू. 7,05,114/- (रूपये सात लाख पाच हजार एकशे चवदा मात्र) रूपयांचे धनादेश वाटप करण्यात आले. यामध्ये कारभारी सुर्यभान नलावडे, रावसाहेब रामराव तायडे (यांना स्वयंरोजगारांतर्गत प्रत्येकी रू. 3,00,000/-), श्रीमती संगीता अजयनाथ वानखेडे (यांना Physical Casualty अंतर्गत 75,000/- रू.), तसेच भाऊसाहेब बापुराव घुले (यांना सदनिका खरेदीसाठी रू. 50,000/-) यांचा समावेश आहे. यावेळी मेजर एस. फिरासत, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी औरंगाबाद तसेच कल्याण संघटक हे उपस्थित होते.

दरवर्षी शासनातर्फे जिल्ह्यात सशस्त्र सेवा ध्वजदिन निधी संकलनाकरिता दिलेल्या इष्टांकानुसार निधी जमा करावयाचा असतो. तो निधी माजी सैनिकांच्या कल्याणार्थ वापरला जातो. या योजनेचा लाभ पात्र गरजू माजी सैनिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

You may also like

महत्वाची बातमी

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने कोर्टात ताबडतोब पुनर्विचार याचिका दाखल करावी

  रावेर (शरीफ शेख) रॅगिंग विरोधी समितीच्या शिफारशी नुसार संबंधित आरोपींवर निलंबनाची कारवाई न करणाऱ्या ...
महत्वाची बातमी

जिल्हा उपनिबंधक श्री कुंदन भोळे यांनी तात्काळ घेतली “पत्रकार संरक्षण समिती” च्या तक्रारीची दखल

सोलापूर  – सोलापूर येथील सोलापूर सिध्देश्वर बँकेच्या मुख्य वसुली अधिकारीने दै . अब तक सोलापूरचे ...