Home राष्ट्रीय नागरिकांनो घाबरून जाऊ नका, मी बरा झालोय… ऐका कोरोनाग्रस्ताचा अनुभव

नागरिकांनो घाबरून जाऊ नका, मी बरा झालोय… ऐका कोरोनाग्रस्ताचा अनुभव

363

राजेश भांगे

नवी दिल्ली , दि. १७ :- कोरोनाने अशी काही दहशत पसरवलीये की अनेक जणांची तहान भूक हरपलीये आणि तोंडचं पाणी पळालंय. पण राजधानी नवी दिल्लीतून एक सकारात्मक बातमी हाती येतीये. कोरोना व्हायरसची लागण झालेला एक व्यक्ती बरा होऊन सुखरूप घरी घरी परतला आहे. त्याने आपला अनुभव सांगितला आहे.
दिल्लीच्या सफरजंग रूग्णालयाच्या विलगणीकरण कक्षातून बाहेर पडल्यानंतर रोहित दत्ता यांनी आपला अनुभव माध्यमांसमोर सांगतिला आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याची काही एक आवश्यकता नाही. धीराने आणि संयमाने सगळ्या गोष्टी हाताळल्या पाहिजेत आणि आपली काळजी आपण घेतली पाहिजे, असं दत्ता यांनी सांगितलंय.
विलगीकरण कक्ष अशी एक खोली आहे की जी एखाद्या लक्झरी खोलीपेक्षा कमी नाहीये. हा विलगणीकरण कक्ष आहे, यावर मला विश्वासच बसत नव्हता. आपलं प्रशासन व्यवस्थितपणे आणि हिमतीने आपल्या पाठीमागे उभा आहे. त्यामुळे काळजी करण्याचं आणि पॅनिक होण्याचं काही एक कारण नाही, असं दत्ता यांनी म्हटलंय.
दरम्यान, नागरिकांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवांचं पीक जोरात आलं आहे. त्यामुळे दत्ता यांच्या अनुभवानंतर नागरिकांनी काळजी करण्यापेक्षा काळजी घेणं हे अधिक सोपस्कर ठरेल.