Home जळगाव ग्रामसेविका मनिषा अहिरे यांच्याविरुद्ध प्रहार अपंग क्रांती चे निवेदन

ग्रामसेविका मनिषा अहिरे यांच्याविरुद्ध प्रहार अपंग क्रांती चे निवेदन

194

रावेर शरीफ शेख

नागदुली तालुका एरंडोल जिल्हा जळगाव येथील ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेल्या ग्रामसेविका मनीषा ताराचंद अहिरे या ग्राम सेविकेने गावातीलच दिव्यांग असलेल्या संदीप नारायण पाटील व राहुल गोपीचंद पाटील या व्यक्तीने दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव असलेल्या पाच टक्के निधीची विचारणा केली असता सदर ग्रामसेविकेने दिव्यांग असलेल्या व्यक्तीला अर्वाच्य बोलून एक प्रकारे चेष्टा केली. सदर व्यक्तीने घडलेली हकीकत एरंडोल प्रहार अपंग क्रांती आंदोलन चे तालुकाध्यक्ष योगेश चौधरी व प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांच्याशी संपर्क साधून तात्काळ एरंडोल येथील गट विकास अधिकारी व तहसीलदार साहेब यांना सदर ग्रामसेविकेची तक्रार अर्ज देताना प्रहार अपंग क्रांती आंदोलन तालुका अध्यक्ष योगेश चौधरी व प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुनील पाटील सोबत प्रहार अपंग क्रांती चे उपतालुका अध्यक्ष पी एन पाटील, प्रमोद सुधाकर चौधरी, संदीप नारायण पाटील, राहुल गोपीचंद पाटील, व इतर प्रहार सैनिक उपस्थित होते या तक्रारी अर्जात सदर ग्रामसेविकेवर योग्य ती कारवाई करण्याचे म्हटले आहे.