Home सातारा महिला ज्योतिष 2020पुरस्काराने सौ पद्मा कासट सन्मानित

महिला ज्योतिष 2020पुरस्काराने सौ पद्मा कासट सन्मानित

125

सतीश डोंगरे

मायणी / सातारा – गुरुकुल ज्योतिष विद्यापीठ पुणे व संजीवनी ज्योतिष प्रशांत प्रशासक मंडळ सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने यंदाचा महिला ज्योतिष पुरस्कार 2020 सातारा येथील ख्यातनाम ज्योती शिक्षिका सौ पदमा जगदीश कासट यांना नुकताच जाहीर झाला व महिला दिनानिमित्त देण्यात आलेल्या महिला अधिवेशनात श्री माननीय नंदकुमार जोशी, डॉक्टर मालती शर्मा ,संजीवनी ज्योतिष मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विकास खिलारे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात सौ.पदमा कासट यांनी 1992 -93 मध्ये व दा भट यांच्या ज्योतीस विद्यापीठातून विशारद परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण सण 1993 94 महाराष्ट्र ज्योतिष मंडळ डोंबिवली येथून शास्त्री परीक्षा विशेष श्रेणीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण 1996 97 मध्ये राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशनात सक्रिय सहभाग भालचंद्र ज्योतिष विद्यापीठ पुणे मार्फत आदर्श ज्योतीष शिक्षिका पुरस्कार 2018 मध्ये झालेल्या अधिवेशनात गौरव पुरस्काराने सन्मानित आंतरराष्ट्रीय ज्योतिष विद्यापीठातर्फे ज्योतिष पुरस्कार सतत पंचवीस वर्षे सातारा ज्योतिष मंडळामार्फत सुरू असलेल्या वर्गासाठी मार्गदर्शन तसेच ज्योतिष शास्त्र सोबत जातकास समुपदेशन गरज आहे समुपदेशनामुळे अनेक तुटणारे संसार पुन्हा आपल्या पायावर उभे राहिले आहेत पुरुषापेक्षा महिलांच्या समस्या वेगळ्या असतात त्या जाणून त्यावर संशोधन सल्ला मार्गदर्शन व समुपदेशन करून अनेकांचे संसार पुन्हा उभे करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे त्यांच्या या यशाचे सातारा ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य रमणलाल शहा संचालक गोविंद कोष्टी सपना पवार सचिव श्री राम देव, पत्रकार दिलीप पुस्तके सहसचिव महेश कुलकर्णी डॉक्टर रमेश दर्भे महेश जोशी डॉक्टर विकास खिलारे यांनी अभिनंदन केले.