Home जळगाव पाचोरा पोलीसांची २४ तासातच वाहन कारवाई…!!

पाचोरा पोलीसांची २४ तासातच वाहन कारवाई…!!

47
0

निखिल मोर

पाचोरा – येथील पंचायत समिती पाणीपुरवठा कार्यालया समोरून चोरीस गेलेली मोटारसायकल २४ तासाच्या आत पाचोरा पोलिसांनीचोरा सह शोधून मोटारसायकल चोरास अटक केली. या घटनेमुळे पोलिस प्रशासनाचे सर्वञ अभिनंदन होत आहे.

भडगाव येथिल शुभम राजेंद्र सपकाळे यांची पल्सर मोटरसायकल १२ मार्च रोजी पाचोरा येथिल पाणिपुरवठा कार्यालयाजवळ उभी असतांना कोणी अज्ञात व्यक्तिने चोरून नेल्याची तक्रार पाचोरा पोलिसांत करण्यात आली.पोलिसांनी सदर मोटारसायकल २४
तासाच्या आत चोरट्यासह ताब्यात घेतली. रेल्वेस्टेशन पाचोरा येथील पारकिंग मध्ये मोटारसायकल होती.ही मोटरसायकल पाचोरा रेल्वे पार्किंगमध्ये कशी आली याचा सखोल तपास करता पोलिसांना संशयित समाधान उर्फ राहुल सोपान बागुल रा.बिलाखेड ता. चाळीसगाव हा यामागिल अज्ञात व्यक्ती असल्याचे आढळुन आले.पोलिसांनी त्यास अटक केली आहे. याकामी पोलिस नाइक राहुल सोनवणे ,विश्वास देशमुख ,विनोद बेलदार यांनी ही कारवाही केली.२४ तासांच्या आत मोटरसायकल परत मिळाल्यामुळे शुभम सपकाळे याना आनंद झाला.त्यांच्यासह पाचोर्‍यातिल नागरिकांकडुन पोलीसांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

Unlimited Reseller Hosting