
परभणी / गंगाखेड – होळकरशाहीचे संस्थापक सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुरूम येथे आयोजित जन्मस्थळी मराठवाड्यातून हजारो कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार, धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर यांनी दिली.
होळकर शाहीचे संस्थापक सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंती 16 मार्च रोजी येत आहे. त्यांच्या जयंतीदिनी मुरूम तालुका फलटण जिल्हा सातारा येथे होणाऱ्या भव्यदिव्य जयंती महोत्सवासाठी मराठवाड्यातून हजारो कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती धनगर साम्राज्या सेनेचे संस्थापक, परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकऱ यांनी दिली .या जयंती उत्सवासाठी मागील पंधरा दिवसांपासून वेगळ्या माध्यमाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.