Home जळगाव जमात-ए-इस्लामी चा ७२ व्या दिवसाच्या धरणे आंदोलनात सहभाग

जमात-ए-इस्लामी चा ७२ व्या दिवसाच्या धरणे आंदोलनात सहभाग

46
0

रावेर (शरीफ शेख)

एन आर सी व संशयास्पद नावे लिहनार नाही तर माननीय गृहमंत्री अमित शहा जी आपण एन पी आर कशासाठी करीत आहात असा रोखठोक सवाल जळगाव मुस्लिम मंचचे समन्वयक फारुक शेख यांनी बहात्तराव्या दिवसाच्या धरणे आंदोलनाला द्वारे शासनाला केला.
एन पी आर ही एन आर सी पहिली पायरी आहे असे गृह मंत्रालयाच्या वेबसाईटवर आजही असून माननीय पंतप्रधान स्पष्टपणे बोलतात की आम्ही एन आर सी चा विचार केलेला नाही. गृह मंत्री म्हणतात आम्ही एन पी आर करतांना डाउट फुल लीहणार नाही , तर मग अमित शहा साहेब एन पी आर ची गरज काय ?
२०२१ मध्ये जनगणना करा त्यात संपूर्ण भारतीय समाज आपल्याला सहकार्य करेल असे आव्हान सुद्धा फारुक शेख यांनी केले.

जमात-ए-इस्लामी- एस आई ओ व जी आई ओ चा सक्रीय सहभाग…!

धरणे आंदोलनाच्या ७२ व्या दिवशी जळगाव शहर जमात-ए-इस्लामी हिंद, स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन व गर्ल्स इस्लामी ऑर्गनायझेशन या संघटनांचा सक्रिय सहभाग होता या तिघी संघटना सह जळगाव शहरातील सामाजिक क्षेत्रातील महिला व पुरुषांनी सुद्धा सहभाग नोंदवूनआपला विरोध नोंदविला. आंदोलनाची सुरुवात मौलाना अब्दुल अहद मिल्ली यांच्या कुराण पठाणाने झाली हम्द सय्यद रफिक पटवे यांनी सादर केली नाते पाक वसीम शेख तर या धरणे आंदोलनाचे प्रास्ताविक शहर प्रमुख मुस्ताक शेख यांनी सादर केले एस आई ओ युनिटच्या तरुणांनी नारे लावले तर एसआई ओ च्या तरुणाईच्या ग्रुपने एक अत्यंत सुंदर असं नाटक या ठिकाणी सादर केले.
सय्यद मजहर आलम ,सोहेल अमीर, अल्तमश खान इंजिनियर, फारुक शेख, करीम सालार यांनी मार्गदर्शन केले जमात च्या महिला प्रमुख नसरीन महेमुद खान यांनीसुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे एनपीआर च्या बायकॉट कसा कराल हे समजून सांगितले.

जी आई ओ ची आयशा देशमुख यांनी तरुणींना सी ए ए व एन आर सी ची माहिती विशद केली.
या संपूर्ण आंदोलनाचे सूत्रसंचालन शिबान फ़ाइज या एस आय ओ च्या तरुणाने केले सोहेल अमीर च्या दुवा ने सांगता झाली.
यावेळी धरणे आंदोलनात न्यायालयाचे हाफिज खान लैंड रेकॉर्ड चे हनीफ खान, बॉम्बे बेकरी चे अबुल कलाम, मुख्याध्यापक मुस्ताक मिर्झा, ट्रस्टचे सचिव फरीद शेख, संचालक निसार अहमद ,माजी सचिव प्रोफेसर एकबाल शहा, पर्यवेक्षक ताजुद्दीन शेख, शिक्षक वृंद शफकत हुसेन, जमील कुरेशी, सय्यद मुखतार, जुबेर अहमद, वसीम अहमद, अतिक खान, शकील खान, रफीक खान यांची उपस्थिती होती *उपजिल्हाधिकारी यांना निवेदन*
शहर प्रमुख मुस्ताक शेख यांच्या नेतृत्वात आयशा देशमुख, सादिया अल्तमश ,सिरत देशमुख, शबाना देशमुख, शबाना देशमुख, सुमया नदीम ,अमरीन निसार, नसरीन महमूद, नीलोफर इक्बाल, अल्तमस खान व सोहेल अमीर यांनी उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांना निवेदन दिले.

Unlimited Reseller Hosting