Home बुलडाणा जमीयत उलेमा ए हिंद शेगावची नवीन कार्यकारिणी जाहीर

जमीयत उलेमा ए हिंद शेगावची नवीन कार्यकारिणी जाहीर

152
0

शहर अध्यक्षपदी हाफिज उस्मान तर तालुका अध्यक्षपदी मौलवी न्यामतुल्लाह

अमिन शहा

शेगाव , दि १३ :- देशपातळीवर सामाजिक कार्य करणाऱ्या जमीयत उलेमा ए हिंद ची शेगाव शहर व तालुका कार्यकारणी गुरुवारी नव्याने गठीत करण्यात आली असून शहराध्यक्षपदी हाफिज उस्मान, सचिवपदी जुबेर सहारा, तालुकाध्यक्षपदी मौलवी नियामतउल्ला खान, तर सचिवपदी डॉक्टर असलम खान यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
मदरसा फातेमातूस जोहरा मध्ये जोहराजमीयत उलेमा ए हिंद चे विदर्भ प्रभारी तथा बुलढाणा जिल्हाध्यक्ष हाफिज खलील सहाब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये जमियत चे जिल्हासचिव तथा दारूल कजा समितीचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती अनिसोद्दीन, हाजी सय्यद अहमद यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीमध्ये हे शहरातील धार्मिक व विविध सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर राहणाऱ्यायांना आमंत्रित करून विचारविनिमय करून जमीयत उलेमा ए हिंद ती शेगाव शहर व तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली यामध्ये शेगाव शहर अध्यक्षपदी हाफिज उस्मान उपाध्यक्ष मौलाना अब्दुल हमीद, हाफिज जिकरुल्लाह, हाफिज शेख नदीम, मौलाना शेख बशीर, सचिव – जुबेर सहारा, सहसचिव हाजी अब्दुल रहीम, हाजी जुबेर अहमद प्रसिद्ध प्रमुख फहीम देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. तर शेगाव तालुका अध्यक्षपदी मौलवी न्यायमतउल्लाह खान, उपाध्यक्ष हाफिज वकार, रशीद शाह, मौलाना सिद्दिक अशरफी,हाजी सैययद इमरान, सचिव – डॉ.असलम खान, सह सचिव हाजी शेख बिस्मिल्लाह, प्रसिद्धि प्रमुख फहीम देशमुख यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीची घोषणा जिल्हाध्यक्ष हाफिज खलील सहाब यांनी केली. यावेळी मदरसा फातेमातूस जोहराचे संचालक हाजी बिस्मिल्लाह, हाजी शेख, रहीम सह समाज बांधवांची उपस्थिती होती. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार मदरसा फातेमातूस जोहराच्या वतीने करण्यात आला.

Previous articleاور پرندے کرنے لگے کعبے شریف کا تواف ؟؟؟
Next articleजमात-ए-इस्लामी चा ७२ व्या दिवसाच्या धरणे आंदोलनात सहभाग
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here