Home मराठवाडा माहूर – भाविकांच्या ऑटोला अपघात! तेरा जखमी; तीन जखमींना यवतमाळ हलविले!

माहूर – भाविकांच्या ऑटोला अपघात! तेरा जखमी; तीन जखमींना यवतमाळ हलविले!

109
0

मजहर शेख

नांदेड / माहूर , दि. १४ :- माहुर तालुक्यातील शेख फरीद वझरा येथील दर्ग्यावर जात असलेल्या भाविकाच्या ऑटो ला दत्तमांजरी घाटात झालेल्या अपघातात 13 भाविक जखमी झाले असून तीन गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे.

माहूर तालुक्यातील शे.फ.वझरा येथे नवस फेडण्यासाठी भोसा जिल्हा यवतमाळ येथील भाविक ऑटो क्रमांक mh 23 x 4943 ने जात होते.चालकाचा ताबा सुटल्याने माहूर गडा वरील दत्त मांजरी गावा जवळील घाटात ऑटो ला आज दिनाक १३ शुक्रवार रोजी दुपारी १२:३० च्या दरम्यान अपघात झाला.त्यात विश्वनाथ कार्तिक शेडमाके (३०), लक्ष्मण रामा सराटे(५०), विनोद लक्ष्मण सराटे (३२), प्रकाश माणिकराव आडे (२१), मारुती कोंडबा मेकरे (६५), प्रदीप पांडुरंग जगताप (४२), अरविंद भीमराव मडावे(२३),सिद्धार्थ दत्ता उबाळे(२४),सौरभ विनोद सराटे (४), विठल नारायण मेकरे(२५), लक्ष्मण चंद्रकांत गेडाम (३०),आकाश प्रल्हाद (२०),निरंजन प्रल्हाद एकलवार(१५),हे तेरा जण जखमी झाले.यांच्या वर माहूर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर मोरे यांनी प्राथमिक उपचार केला.या पैकी विनोद सराटे,प्रदीप जगताप,लक्ष्मण सराटे या तिघा ना अधिक उपचारा साठी यवतमाळ ला हलविण्यात आले आहे.या प्रकरणी माहूर पोलिसात गुन्हा नोद झाला असून ठाणेदार लक्ष्मण राख यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णु मिटकुळे अधिक तपास करत आहे.