Home जळगाव पाचोरा नगरपरिषदेची विविध कर वसूली संदर्भात धडक मोहिमेसाठी प्र.नगराध्यक्ष यांनी घेतली आढावा...

पाचोरा नगरपरिषदेची विविध कर वसूली संदर्भात धडक मोहिमेसाठी प्र.नगराध्यक्ष यांनी घेतली आढावा बैठक

42
0

निखिल मोर

पाचोरा – येथील नगरपरिषदेच्‍या विविध कर वसूलीची धडक मोहीम मुख्‍याधिकारी शोभा बाविस्कर यांच्‍या मार्गदर्शनाखाली न.पा.अधिकारी, कर्मचारी तिव्रतेने करीत आहेत. त्‍यांचा परिणाम म्‍हणून शहरातील बरेचशे करदाते आपलेकडील कराचा भरणा करुन वसूलीस सहकार्य करीत आहेत.
परंतू तरी देखील काही थकबाकीदारांनी करांचा भरणा करीत नसल्याने दिनांक 09/03/2020 रोजी प्रभारी नगराध्यक्ष शरद पाटे यांनी त्यांचे दालनात वसूली संदर्भात कर्मचा-यांची बैठक आयोजीत करण्यात आलेली होती. त्यात जास्तीत जास्ती वसूलीचे उध्दीष्ट पुर्ण करण्याबाबत सुचना देण्यात आल्या.
शासनाकडून वसूलीचे उध्दीष्ट 100% पुर्ण करण्याबाबत शासनाकडून वारंवार सुचना प्राप्त होत असून जे थकबाकीदार त्यांचकडेस असलेली मालमत्ताकर व पाणीपट्टीकर मुदतीत भरणा करणार नाहीत. त्यांचे नळसंकूल तात्काळ बंद करणे तसेच व्यापारी संकूलातील थकबाकीदार गाळा धारकांचे गाळे सिल करण्याबाबत कडक सुचना देण्यात आल्या. नागरीकांनी देखील वेळेवर कर भरणा करुन कटू प्रसंग टाळून नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन यावेळी प्रभारी नगराध्यक्ष शरद पाटे यांनी केले. यावेळी नगरसेवक वाल्मिक पाटील, प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, विधी पर्यवेक्षक भारती निकुंभ, रमेश भोसले, पांडुरंग धनगर, शरद घोडके, सुनील देवरे, चंद्रकांत चौधरी, विजय बाविस्कर, उध्दव महाजन, नरेश पाटील, मंगला सोनवणे, भागवत पाटील, महेंद्र गायकवाड, रफिक बेग, शरीफ खान, सुकदेव ठाकूर आदी कर्मचारी उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting