Home विदर्भ कारंजात एसटी महामंडळाच्या प्रवासी वाढवा अभियानाला चालक वाहकच फ़ासतात हरताळ

कारंजात एसटी महामंडळाच्या प्रवासी वाढवा अभियानाला चालक वाहकच फ़ासतात हरताळ

26
0

आरिफ पोपटे

वाशिम / कारंजा , दि. १३ :- महाराष्ट्राचे एसटी महामंडळ हे नेहमी( तोट्यात नसतानाही) तोट्यात राहते अशी नेहमी कर्मचारी अधिकारी व शासनाकडून ऒरड होत असते पन याला कारण काय याची साधी चौकशी सुद्धा होत नसेल टोटा भरून काढण्या करीता महामंडळा कडून प्रत्येक वेळी निरनिराळ्या प्रकारचे अभियान राबविले जाते मग ते प्रवासी वाढवा अभियान असो की अजुन कोणते परंतु या सर्व अभियानाला महामंडळाच्या चालक वाहकाकडून किती प्रतिसाद मिळतो याची महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी कधी साधी चौकशी तरी केली का ? हे सुद्धा पाहने गरजेचे आहे
असाच काहीसा प्रकार कारंजा आगारात कारंजात एसटी महामंडळाच्या प्रवासी वाढवा अभियानाला चालक वाहकच हरताळ फासत असल्याचे नीदर्शनास आले आहे सद्या महामंडळा कडून प्रवासी वाढवा अभियान पंधरवाडा राबविल्या जात आहे पण या अभियानाला कारंजा आगारातिल काही चालक वाहका कडून छेद दिल्या जात आहे प्राप्त तक्रारीनुसार 11 मार्च 20 रोजी कारंजा बसस्थानाकावर बऱ्याच वेळ नंतर दुपारी 1 वाजुन 20 मिनीटाला मानोरा करिता 2 बसेस लावण्यात आल्या होत्या कदाचित चालक वाहकाच्या लेट लतीफ धोरनामुळे एक बस लेट असेल म्हणून दोन बसेस एकाच वेळी लागल्या असताना दोन्ही बसेस मध्ये प्रवासी बसलेत परंतु चालक वाहकाना कदाचित एक बस रिकामी न्यायची असेल म्हणून बस क्रमांक m h 40 8670 च्या वाहकाने सर्व प्रवासी उत्तरवुन दुसऱ्या बस क्र 8527 मध्ये प्रवासी बसविले असताना पुन्हा याच बसमधुन प्रवासी उत्तरवून 8670 मध्ये प्रवाश्याना बसन्यात सांगितले आधीच दोन्ही बसेस लेट आणि पुन्हा प्रवासांना या बस मधून त्या बस मध्ये बसन्याचा मानसिक त्रास देण्याचा या चालक वाहकांचा प्रयत्न या मुळे प्रवासी कसे वाढनार ? हा सर्व प्रकार पाहुन पत्रकार संतोष कुटे यानी संबधित चालक वाहकाला विचारना केली असता त्यांनी मुजोरी करत तुमच्याकडुन जे होते ते करुण घ्या म्हणत आम्ही महामंडळाच्या भारवश्यावर पोट नाही भरत आमच्या घरी भरपूर आहे अशा उद्धट भाषेत उत्तर दिले यांचे पोट महामंडल च्या भरवश्यावर नाही भरत तर मग खाजगी वाहतूक करणाऱ्या मालकाकडूंन घेवान देवान करुण भरते का असा प्रश्न प्रवाशांनमध्ये उपस्थित केला जात आहे बस्थानकावर बाहेरिल आगाराची बस भरल्या जाते कारंजा आगाराची बस भरली असतानाही चालक गाड़ी काढत नाहीत परिणामी प्रवासी बाहेरिल अगाराच्या बस मध्ये चढतात आणि कारंजाचे चालक रिकामी बस रोडवर चलवतात न
असे प्रकार नेहमी कारंजा आगारात घडतात तरी अशा मुजोर दोन्ही बसेस च्या चालक वाहकावर कठोर कारवाही करण्याची मागणी तक्रार कर्ते पत्रकार प्रा संतोष कुटे यानी केली आहे.

Unlimited Reseller Hosting