Home महत्वाची बातमी सीईओ अशोक काकडे यांची पुणे येथे बदली

सीईओ अशोक काकडे यांची पुणे येथे बदली

79
0

नांदेड , दि.१३ ; ( राजेश भांगे ) –
नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांची आज पुणे येथे सारथी प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी बदली करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिंगरे यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या जागेवर पुणे म्हाडाचे चे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांची नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली होती. अशोक काकडे अगदी सुरुवातीच्या काळापासूनच नांदेड येथे नोकरी करण्यास मनापासून तयार नव्हते. त्यामुळे अगदी सुरुवातीच्या काळापासून नांदेड येथून बदली करून घेण्यासाठी काकडे प्रयत्न करत होते परंतु तब्बल दीड वर्षाहून अधिक काळ प्रयत्न केल्यानंतर आज अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले .नांदेड येथून बदली करून घेत पुणे येथे पुन्हा दाखल झाले आहेत. सारथी प्रकल्पा च्या व्यवस्थापकीय संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली असून नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या रिक्त जागी लवकरच नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती होणार असल्याची माहिती मिळाली आहे .
दरम्यान नांदेड जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉक्टर शिवानंद टाकसाळे यांची नियुक्ती होण्याची अधिक शक्यता असल्याचेही सांगण्यात येते . डॉक्टर शिवानंद टाकसाळे हे नायगाव येथील शरदचंद्र महाविद्यालयात वाणिज्य शाखेमध्ये म्हणून काही वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणूनही त्यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात काम पाहिले आहे. त्यामुळे नांदेड चा चांगला अनुभव असलेल्या टाकसाळे यांची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.