
नांदेड , दि. १२ ( राजेश भांगे ) :-
ग्रामपंचायत कार्यालय ( उमरी ता. ) तळेगावच्या वतीने तळेगाव येथे झालेल्या जलस्वराज्य-२ नवीन पाणीपुरवठा योजना, ग्रामपंचायतची नवीन इमारत

(राजीव गांधी भवन), कै. बाबासाहेब देशमुख गोरठेकर सांस्कृतिक सभागृह, सी.सी रोड, स्मशानभूमी संरक्षण भिंत, दहन शेड, ईत्यादी विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला. विकास कामांचे उदघाटन नांदेड जिल्ह्याचे खासदार मा. प्रतापराव पाटील चिखलीकर , मा. व्यंकटराव पाटील गोजेगावकर (जिल्हाध्यक्ष भाजपा नांदेड), मा. आ. बापुसाहेब देशमुख गोरठेकर, मा. राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना ग्रामपंचायत कार्यालय तळेगाव पुरस्कृत “डॉ बाबासाहेब आंबेडकर जिवन गौरव पुरस्काराने” सम्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास श्री. धोंडबाराव देशमुख तळेगावकर, मा. गणेशराव गाढे (तालुका अध्यक्ष भाजपा), श्री विष्णू पंडित (शहराध्यक्ष उमरी), श्री शिरीषराव देशमुख गोरठेकर (उपसभापती पं स. उमरी), डॉ विक्रम देशमुख (पॅनल प्रमुख तथा सदस्य ग्रा. प. तळेगाव), श्री शिवाजीराव देशमुख (माजी सभापती पं. स. उमरी) , मा. बालाजी पाटील ढगे (मा. तालुका अध्यक्ष भाजपा उमरी), दत्ताहारी पा. कावलगुडेकर, पंचायत समिती सभापती प्रतिनिधी सोनकांबळे, सदानंद खांडरे (न. प. उमरी), सौ ललिताताई आनंदराव यल्लमगोंडे (जि. प.सदस्या), श्री बालाजी जाधव (जि. प. सदस्य ), तालुक्यातील व गावातील सर्व भाजपा पदाधिकारी आदींसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











































