Home महत्वाची बातमी अपंग रश्मी काकडे हिला अाधार फाउंडेशनचा मदतीचा हात

अपंग रश्मी काकडे हिला अाधार फाउंडेशनचा मदतीचा हात

82
0

कारंजा प्रतिनिधि

दिनांक 10/2/2020 ला कु रश्मी बबनराव काकडे सातरगाव यांच्या घरी जाऊन रश्मीचे शिक्षण साेइस्कर होण्यासाठी तसेच त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अाॅटाे रिक्षा ही भेटवस्तू सुई फाउंडेशन कारंजा लाड यांचे कडुन अाधार फाउंडेशन यांचे पुढाकाराने देण्यात आले.

रश्मी ही जन्मतः 90% अपंग अाहे.तीचे 12 वी पर्यंतचे शिक्षण हे गावातच झाले.ती अपंग असल्याने तीला हातावर उचलुन न्यावे लागतात.त्यामुळे तीचे अाई किंवा वडील तीच्यातच गुंततात.त्यांना एकटीच मुलगी अाहे.घरी शेती नाही. शेतमजुरीवर जगनारे ते.परंतु मुलीला शिकवायचं,तिच्या पायावर उभे करायचे,असा तिच्या अाई वडीलांनी मानस केला. तीने पन स्वत:च्या अपंगत्वाला मात करण्यासाठी शिक्षण करुन जाॅब करायचे स्वप्न उराशी बाळगले .घरुन पन तीला पुरेपुर सपोर्ट मिळाला अाणि ते तीची गरज भागवण्यासाठी कटीबद्ध झाले. पुढील तयारीसाठी सुरुवात केली.पण 12 वी नंतर गावात शिक्षण नाही. म्हणून तीची अॅडमिशन नांदगाव खंडेश्वर विनायक महाविद्यालय येथे केली. शिक्षकांचापण तीला भरपुर सपोर्ट मिळाला.त्यांचे जाणे येणे अाॅटोच्या भरवशावर अवलंबून अाहे.अाणि तिचे वडील ही त्यातच गुंतले. बबनरावजी काकडें यांना अाधार फाउंडेशनबद्दल सांगितले अाणि त्यांनी डॉ मंगेश पचगाडे,कैलास चांदणे यांची भेट घेतली.त्यांची गरज ही तिच्यासाठी स्कुटी आणि तिला तिच्या बसण्याची व्यवस्था करायची इतकीच होती.अाधार फाउंडेशन ने तिच्या गरजेप्रमाणे कार्य सुरु केले.यातच डाॅ विनीत साबुसर हे अाधार फाउंडेशन ला जुळलेले असल्यामुळे त्यांचा डाॅ मंगेश पचगाडे यांना काॅल अाला अाणि अॅड. प्रभाकरराव इंगळे काका हे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण गरजुवंताला मदत करनार बोलले अाणि या मुलीला मदत करणार असे बोलले. नंतर अामच्या टीमने सखोल अभ्यास करुन स्कुटी न घेता अाॅटो घेऊन तिच्या जाणे येण्याचा अाणि त्यांच्या रोजगार चा पन प्रश्न मिटेल असे त्यांना सुचवीले,यात पेट्रोल साठी पैसे न मिळाल्यास रश्मी ला पन बोलने न खावे लागनार म्हणून त्याच्यासाठी अाॅटाे चा विचार केला अाणि अाज तीला त्याचा वितरण पण करुन दिलं.तसेच अाॅटोवाला माे.माेसीम यांनी कु रश्मी ला बघताच 5000 रु अाॅटाेचे अानखीन कमी करुन समाजापुढे एक अादर्शच ठेवला.
वितरण करतांनी सुई फाउंडेशन चे अॅड प्रभाकर इंगळेकाका,डॉ विनीत साबु,डॉ नितीन साेनोने,योगेश देशमुख,निरज पाटील हजर होते. तसेच अाधार फाउंडेशनचेडॉ मंगेश पचगाडे,कैलासजी चांदणे,अाशिष खंडार,दिनेश शेळके,शरद घोडेस्वार,मंगेश देवळे,सचिन दुर्गे,अ.साजिद,शुभम भगवे,अाेंकार पडाेळे,सतिश जैन,सागर जैन,माे.माेसीन ,मो शब्बीर हजर होते.

Unlimited Reseller Hosting