Home महाराष्ट्र महिलांच्या प्रगतीत परिवाराची साथ आवश्यक – सौ. अलका भुजबळ

महिलांच्या प्रगतीत परिवाराची साथ आवश्यक – सौ. अलका भुजबळ

112

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

महिलांना आजही विवाहापूर्वी पिता, तर विवाहानन्तर पती म्हणेल तसेच वागावे लागते , यामुळे तिची मोठीच कोंडी होत रहाते.

कोंडी होऊ द्यायची नसेल तर महिलांनी स्वतःची भूमिका निश्चित करून , त्या भूमिकेशी ठाम राहिले पाहिजे तसेच तिच्या परिवाराने तिला पूर्ण साथ दिली पाहिजे,असे आग्रही प्रतिपादन प्रेरक संवादक अलका भुजबळ यांनी केले. नाशिक येथे नुकत्याच आयोजित अखिल भारतीय सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान समारंभात त्याबोलत होत्या. आपले स्वानुभव कथन करताना अलका भुजबळ म्हणाल्या, माझा जन्म मुंबईत एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. दहावीपर्यंत शिक्षण व्यवस्थित पार पडले. पण समाजाच्या रितिभातीनुसार वडील लग्नाचा आग्रह धरू लागले.त्यात मी दिसायला सुंदर असल्याने घर चालत स्थळं सांगून येऊ लागली. पण मला पदवीधर व्हायचेच होते.केवळ श्रीमंत नाही,तर माझ्यापेक्षा जास्त शिकलेला, स्वतःच्या पायावर उभा असलेला जीवनसाथी हवा होता. मी ऐकत नाही ,असे पाहून वडिलांनी पुढे शिकविण्यास नकार दिला. त्याच दरम्यान, टेलिफोन खात्याची जाहिरात पाहण्यात आली. अर्ज केला,मुलाखत झाली, मी निवडल्या गेले. पुढे सकाळी कॉलेज, दिवसभर ऑफिस,दोन भाऊ पण मी एकटीच मुलगी असल्याने,आणि आई दिवसभर बांगडीच्या दुकानात बसत असल्याने सर्व घरकामही मलाच करावे लागे. अशाप्रकारे बीकॉम् झाल्यावरच इच्छित जोडीदाराशी विवाह केला. विवाहानन्तरच अभिनय, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, पर्यटन,विविध शिबिरं असे अनेक उपक्रम पती देवेंद्र भुजबळ यांच्या सहकार्याने करता आले. विशेष म्हणजे माझ्या सासूबाईंना माझ्या उपक्रमांच खूप कौतुक वाटायचं.त्या सतत उत्साह वाढवायच्या. मुंबईत असतील तेव्हा,त्या आनंदाने माझ्या बरोबर यायच्या. त्या माझी आई नसून सासूबाई आहेत,हे कित्येक जणांना सांगून खरं वाटायचं नाही. मुलगी देवश्रीलाही माझा अभिमान वाटत असल्याने तिची खूपच मदद होत राहिली,होत आहे. विशेषतः माझ्या कर्करोगाचे निदान,त्वरित उपचार तिच्यामुळे होऊ शकले. तिने,पतीने धीराने परिस्थिती हाताळली, मलाही धीर देत राहिले.माझ्या कर्करोग लढ्यात डॉ. रेखा डावर खंबीरपणे माझ्या पाठीशी होत्या. दोन वर्षांपूर्वी ,महिला दिनी मी घरी एकटीच होते. प्रचंड एकटेपण वाटत होतं. आणि देवदूताप्रमाणें त्या माझ्या घरी आल्या. ते मोलाचे क्षण मी कधीच विसरू शकत नाही.आदर्श डॉक्टरांच्या त्या मुर्तीमंत उदाहरण आहेत.असो. बोलू तेव्हढे थोडेच! आयोजक श्री महेंद्र देशपांडे यांनी मला इथे बोलावले, पुरस्कार दिला,बोलण्याची संधी दिली याबद्दल मी त्यांची अत्यन्त आभारी आहे. आपणास माझी काही मदद ,मार्गदर्शन हवे असल्यास जरूर संम्पर्क साधा.माझा मोबाईल क्रमांक आहे .

9869043300 / 9869484800

धन्यवाद…!