Home महत्वाची बातमी पत्रकार शेख इम्रान राष्ट्रीय रत्न पुरस्कारा ने सम्माणीत

पत्रकार शेख इम्रान राष्ट्रीय रत्न पुरस्कारा ने सम्माणीत

112

वसीम शेख ,

सिंदखेडराजा : कलाजीवन बहुउद्देश्यीय संस्था व एलक्टरों टेक इंजीनियर सर्विसेस यांच्या वतीने दिला जाणारा मानाचा  ‘राष्ट्रीय रत्न पुरस्कार’ यावर्षी मोताळा तालुक्यातील कोथळी येथील पत्रकार शेख इम्रान शेख उस्मान यांना नागपुर  येथे ८ मार्च रोजी महल्ले सभागृह येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी राज्यातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या ६१ व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
शेख इम्रान यांनी आपल्या कार्यक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना या राष्ट्रीय रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शेख इम्रान यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक विषयावर प्रकाशझोत टाकला. शेख इम्रान हे सामजिक कार्यातसुद्धा अग्रेसर असून त्यांच्या कार्याची दखल घेत त्याना  भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्रच्या माध्यमातून  जिल्हा युवा पुरस्कार देऊन  सुद्धा गौरविण्यात आले आहे. त्यांना या अगोदर आदर्श शिक्षक, युवा पत्रकारिता पुरस्कार सुद्धा देण्यात आला आहे. सदर कार्यक्रमात डॉ.लालबहादुर राणा (गांधी पीस फाउंडेशन नेपाल); मिस सोम्या मंगलानी (नैशनल मिस इंडिया २०१७), डॉ.क्रांति महाजन, युवराज ठाकरे, सागर घोरमाडे आदीच्या हस्ते  सम्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन हा  पुरस्कार शेख इम्रान यांना प्रदान करण्यात आला.