Home महाराष्ट्र होळी निमित्त विशेष….!

होळी निमित्त विशेष….!

116

अमीन शाह – संपादक

पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

वसंताच्या आगमनाची चाहूल लागतानाच साजरा होणारा होळीचा सण त्यापैकीच एक. आज देशभरात होळी उत्साहात साजरी केली जाईल. अनेक ठिकाणी होलीका दहन म्हणजे होळी प्रजलवित करण्यात येते. याला शिमगा असेही संबोधले जाते. जसा हा सण आनंदाचा आहे तसाच तो साजरा करण्यामागे काही विशिष्ट हेतू देखील आहे. साधारणतः फाल्गुन म्हणजेच मार्च महिन्यात येणारा हा सण मृग नक्षत्रापूर्वी संपूर्ण वातावरण शुद्ध करून पर्जन्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती करीत असल्याने होळी पेटवण्याला विशेष महत्त्व आहे.
शिशीर ऋतुतल्या पानगळीमध्ये शेतात जमलेला पालापोचाळा होळीच्या निमित्ताने शेतकरी जाळून टाकायचा. यामुळे शेतजमीनी अधिक सुपीक व्हायच्या. पारंपारिक होळीत झाडांच्या सुक्या काट्या, गोवऱ्या इत्यादी जाळलं जातात. गोवऱ्या जाळल्यानं हवा शुद्ध होते. त्याचप्रमाणे होळीच्या निमित्ताने कडूनिंब-एरण्ड यांसारखी औषधी झाडांचं लाकूडही जाळलं जायचं. हे जाळण्यामागेही शास्त्रीय कारण आहे. थंडीनंतर सुरु होणार्‍या उन्हाळ्याच्या ऋतुसंधिकाळामध्ये रोगजंतूचा प्रसार होण्याचा धोका अधिक असतो त्यामुळे रोगजंतूचा नाश करण्यासाठी तसेच या काळात त्रासदायक कीटकांचा नाश करण्यासाठी होळी पेटवली जाते.

या होळीच्या भोवती फेर धरुन नाचणे हादेखील एकत्रितपणे समूहाला व्यायाम घडवण्याचा व आनंद साजरा करण्याचा; पर्यावरणाला अनुरूप असा उत्सवाचा विधी होता. परंतु आता मात्र पारंपारिक होळीच स्वरूपच पूर्णपणे बदललं आहे. आता होळीसाठी सर्रास झाडांची कत्तल केली जाते, तसेच होळी पेटवताना त्यात प्लॅस्टिक, टायरदेखील जाळले जाते त्यामुळे हवा शुद्ध होण्याऐवजी ती अधिक दूषित होतं जाते.

होलिका दहनचा शुभ मुर्हूत –

या वर्षी होलिका दहन ०९ मार्च रोजी आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार होळी पेटविण्याचा सर्वोत्तम काळ संध्याकाळी २ तास २६ मिनिटांचा आहे. आज, सोमवारी संध्याकाळी ६.२७ ते रात्री ८.५३ वाजतापर्यंत होळी पेटविण्यासाठी शूभमुहूर्त आहे. सोमवारी पहाटे ३.०३ वाजतापासून फाल्गुन पौर्णिमेस प्रारंभ होईल आणि रात्री ११.१८ वाजता पौर्णिमा समाप्ती होईल. मंगळवार (१० मार्च) हा दिवस धूळवड म्हणून साजरा केला जातो आहे.