सातारा

मायणी येथे माजी आमदार स्व.भाऊसाहेब गुदगे यांची ८३वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी

स्व.भाऊसाहेब गुदगे यांच्या प्रतिमेचे पूजन करताना मा.आ.डॉ. दिलीपराव येळगावकर, सचिन गुदगे व इतर,दुसऱ्या फोटोत महिलांची उपस्थिती

मायणी सतीश डोंगरे

सातारा – मायणी ता.खटाव येथे खटाव तालुक्याचे भाग्यविधाते,उरमोडी चे जनक माजी आमदार स्व.भाऊसाहेब गुदगे यांची ८३ वी जयंती ग्रामपंचायत मायणी, माणदेश फौंडेशन,रुरल इन्स्टिट्यूट आँफ रिसर्च सेंटर,प्रा.आ.केंद्र मायणी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.आ.डॉ. दिलीपराव येळगावकर हे होते. युवानेते सचिन गुदगे व मेडिकल असोसिएशनचे सर्व सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती. यादिवशी सकाळी १०वाजता मान्यवरांच्या हस्ते स्व.भाऊसाहेब गुदगे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन आदरांजली वाहण्यात आली.युवानेते सचिन गुदगे यांनी स्व.भाऊसाहेब गुदगे यांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला.तसेच महिला दिनानिमित्त महिलांना आत्मनिर्भर,सुदृढ बनवण्यासाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण,फँशन डिझाईनिंग,ब्युटीपार्लर व फिनाईल मेकींग प्रशिक्षण देणार असल्याचे जाहीर करुन त्यासाठी लागणारे सर्व साहित्यही पुरवणार असल्याचे सांगितले.नुसते प्रशिक्षण देऊन आम्ही थांबणार नसून भविष्यात त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी मदत करण्याची ग्वाही दिली.तसेच मोफत आरोग्य तपासणीत एखाद्या रुग्णास दुर्धर आजार असल्यास त्यास शासकीय व ग्रामपंचायत अशा दोन्ही स्तरावर मदत केली जाईल,असे सांगितले. मेडिकल असोसिएशनचे प्रमुख डॉ.एस.एन.पवार यांनी आपल्या भाषणात भाऊसाहेब गुदगे यांची स्वभाव वैशिष्ट्ये सांगून सर्वांनी आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी हे सांगितले. सौ.नीता गुदगे यांनी आपल्या भाषणात दोन्ही घरांचा राजकीय वसा कसा आहे व आमचे सासरे स्व.भाऊसाहेब गुदगे यांच्या पावलावर पाऊल ठेवून सचिन गुदगे काम करीत असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे सांगितले. डॉ. सौ.ऊर्मिला येळगावकर यांनी महिलांसाठी अशाच पद्धतीने उपक्रम राबविण्यात यावेत असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात डॉ. येळगावकर यांनी सांगितले आजच्या कार्यक्रमातील महिलांची विक्रमी उपस्थिती ही सचिनभाऊंच्या कामाची पोहोचपावती आहे.उरमोडी, जिहे-कठापूर याजनेसाठी भाऊसाहेबांनी केलेल्या कार्याची नोंद खटाव तालुक्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी झाली आहे.भाऊसाहेब हे मोठ्या मनाचे व कार्यकर्त्यांना जपणारे नेते होते असे त्यांनी सांगितले. सर्व रोग निदान शिबिराचा लाभ नागरिकांनी घेतला. कार्यक्रमास डॉ. कुंभार व मेडिकल असोसिएशनचे सर्व सदस्य, उपसरपंच आनंदराव शेवाळे व सर्व ग्रा.पं.सदस्य,ग्रामविकासाधिकारी खाडे, संजय गुदगे, विलास सोमदे,मानसिंगराव देशमुख, ,मज्जिदभाई नदाफ, राजू काबुगडे, राजकुमार चव्हाण, महादेव यलमर,राजू ठोंबरे, नितीन पडळकर, प्रा.आ.केंद्राचे सर्व कर्मचारी ,फुलेनगर,कचरेवाडी, नवीपेठ, येथील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may also like

सातारा

मायणी परिसरात नाविन्यपूर्ण फुलपाखरुंची उपस्थिती , “राज्य फुलपाखरू ‘नीलवंत’ सह सुंदर बटरफ्लाय ची गर्दी”

सतीश डोंगरे मायणी , दि .३- ता.खटाव. जि.सातारा – सभोवतालच्या कोरोना वातावरणात मायणी नगरीत ‘वन्यजीव ...
सातारा

पत्रकार दै.ललकारचे राजेश जाधव यांना “राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार” जाहीर

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी ट्रस्ट मुंबई यांचेवतीने होणार पुरस्काराचे वितरण मायणी / सातारा – विटा ...
सातारा

मायणीत उभारलेले ऑक्सिजन सेंटर खरोखरच कौतुकास्पद – प्रांत अश्विनी जिरंगे

कोरोनाला हरवण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करणे गरजेचे अशा दानशूर व्यक्तीचे कौतुक प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे  ...
सातारा

सातारा जिल्ह्यातील 143 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित तर 3 बाधितांचा मृत्यु

सातारा – प्रतिनिधी जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 143 जणांचे अहवाल ...
सातारा

सातारा जिल्ह्यातील 168 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित , 2 बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू

सातारा / प्रतिनिधी – जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 168 जणांचे ...
सातारा

महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे संस्थापक, ज्येष्ठ ज्योतिर्विद ज्योतिषालंकार श्रीयुत श्रीपाद श्रीकृष्ण भट यांचे निधन

सतीश डोंगरे मायणी / सातारा :- अभ्यासक्रमाच्या शिस्तीतून, विज्ञानाच्या भूमिकेतून व एका शास्त्रीय चौकटीतून ज्योतिष्याची ...