Home मुंबई कोरोना विषयी कोकणातील जनतेने काळजी घ्यावी…!!

कोरोना विषयी कोकणातील जनतेने काळजी घ्यावी…!!

603

गिरीश भोपी

नवी मुंबई , दि. ०६ :- कोरोना विषाणूजन्य आजाराच्या प्रतिबंधसाठी कोकण विभागात विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्हा पातळीवर स्वतंत्र कक्ष हे जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या स्तरावर कार्यान्वित करण्यात आले आहेत. सर्वसामान्य जनतेने याबाबत दक्षता घ्यावी. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन कोकण विभागीय महसूल आयुक्त श्री.शिवाजीराव दौंड यांनी केले आहे.

कोकण विभागात मुंबई शहर, उपनगरासह पाचही जिल्हयात तपासणी पथके, स्कॅनिंगची सोय करण्यात आली आहे. विमानतळ, बंदरे, जेएनपीटी, मेरीटाईम बोर्ड यांच्या मदतीने बाहेरहून येणा-या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. कोकणातील जनतेने होळी उत्सव साजरा करताना काळजी घ्यावी. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी एकत्र येणे टाळावे. सर्व सामान्य जनतेला मास्क घालण्याची आवश्यकता नाही. कोरोना विषयी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असेही आवाहन श्री.दौंड यांनी केले आहे.

*कोरोना विषयी माहिती*

कोरोना जंतु हे कोरोना परिवारातला विषाणू आहे. ते श्वसनाचे संसर्गजन्य रोग निर्माण करतात. यापुर्वीचे कोरोना आजार म्हणजे सार्स, मर्स आहेत. ते प्राणिजन्य विषाणू आहेत. या साथीची सुरुवात चीन मधल्या बुहान शहरात झाली. तेथे एका मांस बाजारपेठेच्या संपर्कात असलेल्या लोकांना श्वसनाचे विकार निर्माण झाले आणि तिथूनच ते जगभरात पसरले. मासे, कोंबड्या, वटवाघूळ, साप हे कोरोना वायरसचे स्त्रोत आहेत. या विषाणूचा प्रसार श्वसनक्रियेमार्फत, अस्वच्छ हातामुळे, पचनसंस्थेमार्फत (दुर्मिळ) होतो. याची लक्षणे सौम्य लक्षणे हलका ताप, घसा दुखी, खोकला, अंगदुखी, मरगळ , मध्यम लक्षणे जोराचा ताप, पिवळा बेडका, छातीत दुखणे, दम लागणे, तीव्र लक्षणे श्सवनक्रिया अपयशी, शरीरभर संक्रमण, इतर अवयव निकामी, मृत्यू अशी आहेत. संवेदनशील लोक गरोदर स्त्रिया, लहान मुले, वयोवृध्द, रोगप्रतिकारशक्ती, स्टिरॉईड, कॅन्सर इत्यादींची काळजी घेतली पाहिजे.

या आजाराचे निदान रीयल टाईम पी.सी.आर. विषाणूच्या जनुकीय रचनेची चिकित्सा, घशातील/थुंकीतील/शरीरातील द्रव्य, ही तपासणी कस्तुरबा रुग्णालयात केली जाते. लाक्षणिक चाचण्या, रक्ताच्या पेशीची चाचणी, छातीचा एक्स-रे आणि सी.टी.स्कॅन याद्वारे होते. या आजारासाठी विशिष्ट उपचार नाही किंवा लसीकरण उपलब्ध नाही. लाक्षणिक उपचार, रुग्णाला वेगळी निगा, संतुलित आहार आहे. याच्या प्रतिबंधासाठी हाताची स्वच्छता, जागतिक आरोग्य संघटनेप्रमाणे विशिष्ट मास्क ( *N95* ) वापरणे, नीट शिजवलेले अन्न खाणे, रोगप्रतिकारशक्ती वाढविणे हे आहेत.

या आजाराविषयी नीट शिजवलेला नॉनव्हेज अन्नापासून होत नाही, चायनिज अन्नापासून किंवा वस्तूंपासून होत नाही, पाळीव प्राण्यांपासून धोका नाही, लक्षणमुक्त लोकांना मास्क वापरायची गरज नाही, प्रत्येक सर्दी खोकला हा कोरोना आहे असे समजू नका. सौम्य आणि मध्यम आजारात उपचार शक्य असे गैरसमज लोकांमध्ये करण्यात आले आहेत. या आजारापासून दूर राहण्यासाठी हात स्वच्‍छ ठेवा, नीट शिजवलेले अन्न खा, अस्वच्छ हातांनी नाकातोंडाला स्पर्श करू नये, गर्दी टाळा, संतुलित आहार घ्या असे आवाहन करण्यात येत आहे.