Home विदर्भ आरोग्य कर्मचाऱ्यांचे ३ मार्च रोजी जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन संपन्न.!

आरोग्य कर्मचाऱ्यांचे ३ मार्च रोजी जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन संपन्न.!

433

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा कर्मचारी समन्वय समिती जिल्हा शाखा वर्धा च्यावतिने ३ मार्च २०२० रोजी कामगार नेते दिलीप उटाणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
जिल्हा परिषद व राज्यस्तरीय आरोग्य कर्मचाऱ्यांचे रिक्त पदे त्वरीत भरा.
RCH NCD इत्यादी कार्यक्रमाचा डाटा एन्टी करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना सक्ती करणे यासाठी पर्यायी व्यवस्था करा,
आरोग्य कर्मचाऱ्यांना गुगलसिट व गुणाकंन पध्दत रद्द करा,
कंञाटी आरोग्य सेविकाव सहाय्यीका यांना रिक्त पदावर शासन / जिल्हा परिषद सेवेत कायम करा , आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतन ञुटी दूर करा, आरोग्य विभागाचे खाजगीकरण बंद करा, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदनामात बदल करा आरोग्य उपकेंन्दातील अंशकालीन स्त्री परिचर यांना किमान वेतन १८००/- रुपये त्वरीत देण्यात यावे.
कंञाटी महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवसाची प्रसुती बालसंगोपन रजा व अन्य लागू करा,
अनुकंपा भरती तात्काळ करण्यात यावी .इत्यादी मागण्याचे निवेदन मा.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे .सार्वजनिक आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांना निवेदन देण्यात आले
तर स्थानीक मागण्या आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य सहाय्यक / सहाय्यीका यांच्या संवर्गातील पदोन्नती करा,
आरोग्य कर्मचाऱ्यांचे १० ,२०, ३० वर्षे आश्वासीत प्रगती योजनेचे लाभ त्वरीत देण्यात यावे,
शासन निर्णय १७ जानेवारी २०१३ नुसार मंजूर पदाचे निश्चिती व बिंदूनामावली बदली प्रकिया पुर्वी करुन पद भरती करा , इत्यादी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या १४ स्थानिक मागण्यावर मा.सिईओ साहेब यांनी १७ मार्च रोजी बैठक आयोजित केली
आंदोलनाचे नेतृत्व राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे जिल्हा अध्यक्ष सिध्दार्थ तेलतुंबडे वैभव तायवाडे वंदना उईके दिपक कांबळे नलिनी उबदेकर अरविंद बोटफुले गजानन थुल सुजाता कांबळे संगीता रेवडे अनुराधा परळीकर संजय डफरे रतन बेंडे गणेश निमजे संजय तायडे रवि चंदे यांनी केले
वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत
आंदोलनाला अँड अशोक वाघ सामाजिक कार्यकर्ते रविन्द कोटंबकार ( पाटील) तसेच मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे हरिचंन्द लोखंडे प्रकाश बमनोटे यांनी पांठीबा दिली
रिक्त पदे असताना ग्रामीण भागात आरोग्य सेवेचे काम सोडून बाबूगीरीचे काम दिले असून त्या परिषञकाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना २५७/८९ तसेच हिवताप कर्मचारी संघटनेच्या वतिने
आरोग्य संचालयाच्या चुकीच्या निर्णयाने जनतेला आरोग्य सेवा द्यावी की फक्त आँफीस मध्ये बसून डाटा एन्टी करावी अशा प्रश्न आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पुढे निर्माण झाला आहे. RCH .NCD , अनेक वर्षा पासून करीत असून पून्हा बाबूगीरी गुगलसिट गुणांकन व IHIP डेली फिडींग चे नोंदीसाठी दडपण सुरु झाले आहे .त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांत संतापाची लाट पसरली आहे . गावात जावुन आरोग्य सेवा किंवा दैनंदिन बाबूगीरी अशा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे
RCH .NCD ,गुगलसिट गुणाकंन आँनलाईन नोंदीसाठी शासनाने स्वतंत्र व्यवस्था अवलंबिण्यात यावी, आरोग्य विभागीतील रिक्त पदे भरण्यात यावे तसेच स्थानिक मागण्यांना घेवून *वर्धा जिल्हा परिषदे समोर ( ३ मार्च ) आयोजित विशाल धरणे आंदोलनात जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येनी सहभागी होते.
एस पी गायकवाड .ललिता अडसर अनुराधा परळीकर रत्नमाला लोखंडे किरणपांडे डि.डी मांढरे आर्चना बोबडे शैला नंदेश्वर निलेश साटोणे प्रशिल माटे विकास माणिककुडे बाबाराव कनेर भिमराव खूडे दिलीप धुडे दिनेश भारती घनशाम जिवतोडै प्रमोद धुडे उदय साळवे शरद डांगरे सजय डगवार उमा चौधरी महेन्द मुसडे अँड अशोक वाघ प्रमोद लकडे अशोक भुजाडे सुर्यकांत वाघुले एकनाथ देवढे रंगराव राठोड यांनी मार्गदर्शन केले.