Home विदर्भ पुसद येथे बहुजन क्रांती मोर्चाचे एनपीआर विरोधात भव्य धरणे प्रदर्शन आंदोलन संपन्न

पुसद येथे बहुजन क्रांती मोर्चाचे एनपीआर विरोधात भव्य धरणे प्रदर्शन आंदोलन संपन्न

285
0

विविध सामाजिक धार्मिक संघटनांचा सहभाग

पुसद , दि. ०५ :- येथे दिनांक 4 मार्च 2020 रोजी तहसील कार्यालयासमोर बहुजन क्रांति मोर्चाच्या नेतृत्वाखाली अनेक बहुजनवादी संघटनांच्याद्वारे राष्ट्रीय जनसंख्या रजिस्टर (एनपीआर) बायकॉट आंदोलनाअंतर्गत पहिल्या टप्प्यातील धरणे आंदोलन शेकडोंच्या उपस्थितीत यशस्वीरित्या संपन्न झाले.या आंदोलनाचे नेतृत्व गणपत गव्हाळे(रा.आदीवासी एकता परिषद) तहसिन खान (रा. मुस्लिम मोर्चा)सुभाष धुळधुळे (भारत मुक्ती मोर्चा)इंदलभाऊ राठोड (रा. गोरबंजारा क्रांती संघ) लक्ष्मण कांबळे,राजेश ढोले, अर्चना खंदारे (रा. मुलनिवासी महिला संघ) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
नागरिकता संशोधन अधिनियम (सीएए), राष्ट्रीय नागरिकता रजिस्टर (एनआरसी), इव्हीएमच्या विरोधात,डीएनए आधारित एनआरसीच्या समर्थनात, ओबीसींची जाति आधारित गिनती न करण्याच्या विरोधात, सरकारी कंपन्या उद्योगपतींना कवड़ीमोल भावात विकून खाजगीकरण करण्याच्या विरोधात,आदीवासींना षडयंत्रपूर्वक हिन्दू बनवून त्यांची मूळ ओळख नष्ट करण्याच्या विरोधात,एससी,एसटी,ओबीसी व धार्मिक अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात,घुमंतु जनजातींना राष्ट्रीय मान्यता न देण्याच्या विरोधात,लिंगायत व शीख धर्माला स्वतंत्र मान्यता न देण्याच्या विरोधात,शेतकर्यांना खर्च आधारित हमीभाव न देण्याच्या विरोधात 4000 तहसीलमध्ये व 550 जिल्ह्यांमध्ये हे धरणे आंदोलन एकाच दिवसी एकाच वेळी करण्यात आले. एनपीआरमध्ये दिल्यागेलेल्या माहितीचा दुरूपयोग करून या माहितीचा वापर एनआरसीसाठी करून येथील बहुजन समाजाला नागरिकत्वच्या अधिकारापासून वंचित करण्याचे षड्यंत्र सरकार द्वारा केले गेले आहे. याच्या विरोधात देशभरात एनपीआर बहिष्कार अर्थात बायकॉट आंदोलन करण्याचा निर्णय बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक मा.वामन मेश्राम यांनी घेतला आहे.
आवश्यक पूराव्याअभावी देशातील बहुतांश एस सी, एस टी.ओ बी सी व धार्मिक अल्पसंख्याक जसे मुस्लिम, बौद्ध, लिंगायत, जैन आदि समुदायातील नागरिक नागरिकत्वाच्या अधिकारापासून वंचित होणार आहेत.सीएए एनआरसीसारखे कायदे देशाच्या नागरिकांना धर्माच्या आधारावर विभाजित करण्याचे काम करीत आहेत. हे कायदे मागासवर्गीय व धार्मिक अल्पसंख्यांकांच्या विरोधात आहेत. तसेच हे कायदे भारताची एकता व अखंडता बाधित करू शकतात. अशा संविधान विरोधी व लोकशाही विरोधी कायद्याचा विरोध करणे हे प्रत्येक जागरूक नागरिकाचे प्रथम कर्तव्य आहे.म्हणून बहूजन क्रांति मोर्चा द्वारे देशभर 4 चरणांमध्ये आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याप्रमाणे पहिला टप्पा दिनांक 4 मार्च 2020 रोजी तहसील कार्यालय पुसद येथे भव्य धरने प्रदर्शन करून संपन्न झाला. या धरने प्रदर्शनात अनेक बहुजनवादी सामाजिक संघटनांनी आपला सक्रिय सहभाग नोंदविला.
दुसरा टप्पा 11मार्च रोजी तहसील स्तरावर रॅली प्रदर्शन, तिसरा टप्पा 18 मार्च रोजी ब्लाॅक स्तरीय ऱॅली प्रदर्शन,चौथा टप्पा 26 मार्च रोजी भारत बंद आंदोलन व पाचवा टप्पा 1एप्रिल पासून एनपीआर बायकाॅट (बहिष्कार) आंदोलनाने संपन्न होणार आहे.
या सर्व आंदोलनात सर्व मागासवर्गीयांनी व धार्मिक अल्पसंख्याकांनी सहभागी व्हावे असे आवाहन बहुजन क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी केले आहे.
यावेळी महामहीम राष्ट्रपतींना एसडीओ मार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी सै.सिद्दिकोद्दीन,शरद जाधव,देवाभाऊ जगताप, संतोष पडघणे,शिवाजी मळघणे,
आकाश गडदणे,नामदेव इंगळे,विकास गडदणे,फिरोज खान,शे.रहीम,प्रल्हाद सवंगडे
जानी भाई,प्रदीप राठोड, राजरतन कांबळे, जांबूवंत राठोड,अब्दुल रहेमान चव्हाण, हकीम चव्हाण, मुकेश केवटे,मोहम्मद खान, मौलाना सलीम, मौलाना शकील, नारायण कोकणे, जब्बार भाई, अभिजीत पानपट्टे,जनार्दन कोल्हे, अमजद खान, राहुल धुळधुळे,प्रह्लाद नरवाडे, ताई धुळधुळे, सविता जाधव, पोर्णिमा हनवते,वैशाली कांबळे,वर्षा सुरवाडे आदींसह शेकडो विविध संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleआरोग्य कर्मचाऱ्यांचे ३ मार्च रोजी जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन संपन्न.!
Next articleफक्त संशयमुळे गेला त्याचा जीव…!!
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here