Home मराठवाडा भ्रष्टाचार प्रकरणी माजलगावचे भाजपचे नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना अटक

भ्रष्टाचार प्रकरणी माजलगावचे भाजपचे नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना अटक

14
0

आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी केली कारवाई

अमीन शाह

बीड , दि. ०५ :- पालिकेच्या भ्रष्टाचार प्रकरणी माजलगावचे भाजपचे नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखा आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.

माजलगाव नगर पालिकेत विविध विकास कामांमध्ये पाच कोटींपेक्षा अधिक रक्कमेचा अपहार झाल्या प्रकरणी ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात तत्कालीन दोन मुख्याधिकारी यांच्यासह भाजपचे नगराध्यक्ष सहाल चाऊस यांचेही नाव होते. या सर्व प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे होता. त्यांनी चाऊस यांना आज चौकशीसाठी ताब्यात घेतलं. सह आरोपी करत आज न्यायालयासमोर हजर केलं आहे. चाऊस यांनी नगराध्यक्ष पदाच्या काळात सत्तेचा दुरुपयोग करत भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
माजलगांव नगरपालिकेत कोट्यवधीच्या अपहार प्रकरणी काही दिवसांपूर्वी तत्कालीन दोन मुख्याधिकाऱ्यांविरोधात ४२० कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच दोन्हीही अधिकारी फरार होते. या गुन्ह्या प्रकरणी आज स्थानिक गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखेने माजलगांवचे नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. आज अखेर अटक करून न्यायालया समोर हजर करण्यात आले आहे.