Home विदर्भ अस्तित्व फाउंडेशनडे अध्यक्षा सौ. अल्का कोथळे रोटरी सेवा पुरस्काराने सम्मानित….!!

अस्तित्व फाउंडेशनडे अध्यक्षा सौ. अल्का कोथळे रोटरी सेवा पुरस्काराने सम्मानित….!!

66
0

यवतमाळ , दि. ०४ :- यवतमाळ जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य करणार्‍या तसेच सामाजिक कार्याची दखल घेऊन यवतमाळ येथील अस्तित्व फाउंडेशन अध्यक्षा सौ. अल्का विनोद कोथळे यांना 3 मार्च रोजी रोटरी क्लब यवतमाळ तर्फे बचत भवन येथे आयोजित कार्यक्रमात सौ अल्का कोथळे यांनी केलेल्या विविध सामाजिक उपक्रमाबाबत रोटरी सेवा पुरस्काराने अस्तित्व फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ. अल्का कोथळे यांना मानचिन्ह, शाळ, श्रीफळ् व पुष्पगुच्छ देऊन गोदावरी अर्बन मल्टी स्टेट को. ऑप. बँकेच्या अध्यक्षा सौ. राजश्रीताई हेमंत पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी दिलीप बाविस्कर यांंच्या शुभहस्ते सम्मानित करण्यात आले.
या अगोदर सौ. अल्का कोथळे यांना सावित्रीबाई फुलेे नारी रत्न पुरस्कार, सोशल वुमन ऑईकॉन पुरस्कार आदि पुरस्कारांने सम्मानित करण्यात आले आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बळ समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उन्नतीचा ध्यास घेऊन शिक्षण, प्रबोधन, सहाय्य व आरोग्य आदि विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अस्तित्व फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. अलका कोथळे यांना रोटरी क्लब ऑफ यवतमाळ तर्फे उत्कृष्ट सेवा पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. सौ. कोथळे यांनी आपल्या या उज्वल यशाचे श्रेय आपले पती विनोद कोथळे व अस्तित्व फाउंडेशननच्या सर्व सभासदांना दिले आले. रोटरी क्लबचे अध्यक्ष राजुभाऊ गडीकर, जलालुद्दीन गिलाणी, दिलीप राखे, अजय म्हैसाळकर, डॉ. सौ. माणिक मेहरे, डॉ. सुरेंद्र पद्मावार सरांचे त्यांनी आभार व्यक्त केले आहे.