Home विदर्भ किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शक कार्यक्रम.!

किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शक कार्यक्रम.!

65
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – जिल्ह्यातील नेरी पुनर्वसन सालोड येथिल बुद्ध विहारात “वयात येताना या विषयावर किशोरवयीं मुलींना मार्गदर्शन पर कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे मार्गदर्शक “डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क वर्धा या महाविद्यलयातील विद्यार्थिनी कु. प्राजक्ता निखार व आलेश्या ठाकरे या होत्या. ह्यांनी मुलींना अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. ह्यमधे प्राजक्ता निखार हिने मूली वयात येताना मासिक पाळी संदर्भात आपली काळजी कशी घ्यावी याबद्दल महिला व खास करुण मुलींना मार्गदर्शन केले. तसेच आलेश्या ठाकरे हिने दैनदिन जीवनात कोणते आहार घ्यावे आणि मासिक पाळीच्या दिवसात कोणता आहार सेवन करावा व कोणता टाळवा. या बद्दल मार्गदर्शन केले. आणि डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क वर्धा येथील विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. विcवेक राउल, प्रतीक्षा कलबंदे,त्यामधे कु. प्रतीक्षा पखाले, प्रिति तेलंग ,कु. प्रिती राठोड़, कु. प्रणाली वेले.यांचा समावेश होता.