Home उत्तर महाराष्ट्र जुवार्डी वनक्षेत्रातील पाझर तलावाचे आमदारांच्या हस्ते भुमिपुजन

जुवार्डी वनक्षेत्रातील पाझर तलावाचे आमदारांच्या हस्ते भुमिपुजन

46
0

आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नांना यश

निखिल मोर

जळगाव / पाचोरा ✒ जुवार्डी वनक्षेत्रातील चाळीस वर्षापासून प्रलंबित असलेले पाझर तलाव क्र. ३ च्या कामाचे भूमिपूजन तसेच हा प्रश्न सुटावा म्हणून योगदान देणारे अधिकारी, पत्रकार, उपोसनकर्ते व सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार सोहळा आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते पार पडला. जुवार्डी वनक्षेत्रातील पाझर तलावाचे काम पूर्ण व्हावे म्हणून ग्रामस्थांचा ३५ वर्षांपासून लढा सुरु होता. यासाठी मागील वर्षी ग्रामस्थांनी उपोसन, आंदोलन उपसले होते. प्रश्न सुटला नाही तर मी जुवार्डी गावात पाय ठेवणार नाही तसेच मते मागायला ही येणार नाही असे आश्वासन आमदार किशोर पाटील यांनी ग्रामस्थांना दिला होता. आमदारांनी दिलेला शब्द खरा करून दाखविल्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने आमदार किशोर पाटील यांचा मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. गावातील सैन्य दलातून प्रदीर्घ सेवा करून निवृत्त झालेले सैनीक संजय पाटील, मच्छिंद्र पाटील, पिंटू पारधी यांचा सत्कार आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
सत्कार सोहळ्याची सुरुवात शहीद देविदास पाटील स्मारकास अभिवादन करून झाली. पाझर तालावाचा प्रश्न निर्भीडपणे वृत्तपत्रांच्या माध्यमातून उपस्थित करणारे तसेच शिक्षण, आरोग्य, सिंचन, शेतकरी व युवक कल्याण संबंधी प्रश्नांकडे पत्रकारितेच्या माध्यमातून लक्ष वेधणारे पत्रकार संजय हिरे, आनंदा महाजन, रवींद पाटील, सुधाकर पाटील ह्यांचा मानपत्र देवून ग्रामस्थांनी गौरव केला. जुवार्डी पाझर तलावाचा किचकट प्रश्न सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, डॉ. बी. एन. पाटील, उपजिल्हाधिकारी रोहयो प्रसाद मते, उपवनसंरक्षक दिगंबर पगार, जलसंधारण अधिकारी राजन नाईक, जलसंधारण अभियंता एस. एल. पाटील, किरण बोरसे, पी आर सोनवणे, रोहयो अभियंता विनोद पवार यांचाही मानपत्र देवून ग्रामस्थांच्या वतीने गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या वतीने एस.
एल. पाटील यांनी सत्काराचा स्वीकार केला. जुवार्डी येथील उपोसनकर्ते हेमराज पाटील, काशिनाथ पाटील, रमेश पाटील, रवींद पाटील, तात्या पाटील, जगन पाटील, सखाराम पाटील, विजय साळुखे, प्रकाश पाटील तसेच सामाजिक कायकर्ते प्रा. राजेंद्र पाटील, प्रकाश शिवराम पाटील, गोपीनाथ पगारे, अविनाश पाटील, आर डी पाटील, भूषण पाटील, शिक्षक विनोद पाटील, विस्वास पाटील ह्यांचा ही मानपत्र देवून आमदार किशोर पाटील ह्यांनी गौरव केला. माजी सरपंच विस्वास पाटील ह्यांनी ह्याप्रसंगी संबोधित करताना आमदार किशीर पाटील तसेच पत्रकार बंधू तसेच प्रश्न सुटण्यासाठी सहकार्य करणारे अधिकार्यांचे आभार मानले. सत्कार समारंभाचे प्रास्ताविक व सूत्र संचालन प्रा. राजेंद्र पाटील ह्यांनी केले. याप्रसंगी माजी जि.प. शिक्षण सभापती विकास पाटील, जि.प. सदस्य संजय पाटील, माजी पस सभापती रामकृष्ण पाटील, भडगाव शेतकरी संघ संचालक युवराज पाटील, माजी नगराध्यक्ष सुनील देशमुख, जिल्हा शिवसेना उपप्रमुख गणेश पाटील, जुवार्डी सरपंच राजेद्र पाटील, आडळसे व पथराड येथील सरपंच डॉ. अविनाश पाटील, भाऊसाहेब पाटील. शिवसेनेचे प्रवीण पाटील, प्रकाश पाटील ग्राप सदस्य मधुकर पाटील, चंद्रशेखर पाटील, अजय पाटील, प्रकाश पाटील, दत्तू पाटील, डॉ. चेतन पाटील, बापू सूर्यवंशी तसेच जुवार्डी, आडळसे व पथराड येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting