Home जळगाव शेख जावेद शेख याकुब यांना शहीद अब्दुल हमीद पुरस्कार ” प्रदान

शेख जावेद शेख याकुब यांना शहीद अब्दुल हमीद पुरस्कार ” प्रदान

85
0

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यातील यावल येथील सर सैय्यद अहमद खान उर्दू प्रायमरी चे शिक्षक यांना शिक्षणाचे माहेर घर पुणे येथे आयोजित एका कार्यक्रमा मध्ये ” शहीद अब्दुल हमीद पुरस्कार ” देण्यात आला.
शेख जावीद यांनी शैक्षणिक क्षेत्रा मधे तसेच सामाजिक कार्याच्या माध्यमातून केलेल्या महत्वपूर्ण कार्योंची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
या वेळी त्यांना सह परीवार सन्मानित करण्यात आले त्या क्षणी त्यांचे वडील शेख याकुब ,आई खुदेजा बी ,पत्नी शफीका परवीन , मुलगी तुबा नाज व मुलगा शेख ताहा सोबत होते या
पुर्वी शेख जावेद यांना अमरावती, मुंबई, दिल्ली.शिडी व इतर ठिकाणी जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत.
कार्यक्रम पत्रकार भवन नवी पेठ पुणे येथे
आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन अॅडवोकेट वैशाली एन भोसले यांनी केले होते.