जळगाव

बँक प्रतिनिधी आणि जागरूक ग्राहक यांच्या समन्वयाने मुद्रा योजना अंमलबजावणी व्हावी –  खा. रक्षा खडसे

Advertisements

रावेर (शरीफ शेख)

केंद्र सरकारच्या मुद्रा योजना होतकरू व्यवसायिकांना विकसित करण्यासाठी बँक, प्रशासन आणि ग्राहक यांच्या समन्वयाने कर्ज वितरण प्रणाली राबविण्यात यावी असे आवाहन खा रक्षा खडसे यांनी रावेर येथील तालुकास्तरीय मेळाव्यात अध्यक्षीय भाषणातुन केले.
रावेर येथील नाईक महाविद्यालयात जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री मुद्रा योजना व शासकीय योजनांचा तालुकास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी जीप अध्यक्ष सौ रंजना पाटील, रावेर नगराध्यक्ष दारा मोहम्मद, सावदा नगराध्यक्ष सौ अनिता येवले, पस सभापती जितेंद्र पाटील, प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले, श्रीराम फौंडेशन अध्यक्ष श्रीराम पाटील, तहसीलदार अभिलाषा देवगुणे, रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ चेअरमन हेमंत नाईक, भाजपा तालुकाध्यक्ष राजन पाटील, नगरसेवक शे सादिक, केंद्र प्रमुख कामालोद्दीन शेख, प्र गट विकास अधिकारी हबीब तडवी, प्राचार्य श्री दलाल, किमान कौशल्य विकास सहा संचालक अनिसा तडवी आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरवात दीपप्रज्वलनाने करण्यात येऊन सर्वप्रथम मुद्रा लोण लाभार्थी प्रकाश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर नगरपालिका प्रकल्प संचालक निलेश पाटील यांनी बचत गटांच्या योजना सविस्तर सांगितल्या. श्रीराम उद्योग समूह अध्यक्ष श्रीराम पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, प्रत्येक व्यक्तीने आपल्या आर्थिक विकासासाठी बँक व्यवहार समजून घेणे आवश्यक आहेत.लोन घेतांना आपण व्यवसाय करण्यासाठीच स्वीकारा, केवळ मिळते म्हणून घेऊ नका. कर्ज घेण्याआधी सुरू करावयाच्या उद्योगाचं परिपूर्ण अभ्यास करावा. ग्रामीण भागात टॅलेंट खूप आहे त्याला चकाकी देण्याचे काम प्रशासनाने करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले.
प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी सांगितले की, भारताचा विकास दर मध्ये 40 टक्के सहभाग हा लघु उद्योगाचं असून त्यांना अधिक बळकट करून पाठबळ देण्याचे काम मुद्रा योजना करीत आहे. आजचा युवक भरकटत आहे तो विकासाच्या म्हणजेच कामकाजाच्या प्रवाहात येणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्ती हा आर्थिक साक्षर होणे आवश्यक आहे. कर्ज मिळत नाही म्हणून बँके विषयी गैरसमज करून घेऊ नये. आपल्या अंगी असलेल्या कौशल्याला भरारी देण्याचे देखील त्यांनी आवाहन केले.
खा रक्षाताई खडसे यांनी देखील संगीत की, प्रधान मंत्री मोदीजी यांच्या स्वप्नांना आपण बळ देवू या. यासाठी या मुद्रा योजनेचे नियोजन आणि वापर योग्य रीतीने झाल्यास विकास उंचावेल. कर्ज देतांना बँकांना देखील काही बंधने आहेत त्यांच्या अडचणी देखील आपण सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन शे गजाला तबस्सुम आणि ज्योती बोंडे यांनी केले
मेळावा यशस्वीतेसाठी जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिमाका अधिकारी विलास बोडके यांच्या नेतृत्वाखाली सुनील जोशी, अनिल सूर्यवंशी, जिल्हा उद्योग केंद्राचे सुनील पाटील यांच्यासह सर्व कर्मचारी बँक प्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले.

You may also like

जळगाव

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी केली जम्बो कार्यकारिणी जाहीर… आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप…

अमळनेर  –  येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी आमदार अनिल ...
जळगाव

ज्येष्ठ नागरिक संघाच्या बहुउद्देशिय सभागृहाचे भूमिपूजन संपन्न

रावेर (शरीफ शेख) जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या संकल्पित बहुउद्देशिय सभागृहाच्या ...
जळगाव

आरटीई नुसार झालेल्या प्रवेशप्रक्रियेच्या चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वावडदा येथील पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले निवेदन रावेर (शरीफ शेख) जळगाव जिल्ह्यातील वावडदा येथील एल.एच.पाटील इंग्लिश ...