Home मराठवाडा दोन कोठ्याला आग लागून लाखोंचे नुकसान , शेतीउपयोगी सामान ही जळाला

दोन कोठ्याला आग लागून लाखोंचे नुकसान , शेतीउपयोगी सामान ही जळाला

139
0

श्रीहरी राजेंद्र अंभोरे पाटील

हिंगोली , दि. ०१ :- जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील सातेफळ येथील गट क्रं २०६ मधील शेतकरी नागनाथ नारायण अंभोरे व माहादु बाजीराव अंभोरे बाबु बाजीराव अंभोरे यांच्या एकाच ठिकाणी तीन भावाचे आखाडे आहेत त्या पैकीं महादु व नागनाथ या दोन भावांच्या आ आखाड्यात आग लागली आहे.

आखाड्याचे आतर जवळ जवळ असल्याने एका आखाड्याला लागलेलि आग दुसर्या आखाड्याला लागली व दोन आखडयाला आग लागुन दोन लाखा पेक्षा जास्त नुकसान झाले आहे सातेफळ येथील शेतातील आखाड्यांला आज सकाळी सकाळी अचानक आग लागली त्या आगीत खोळीत (निवारा) मध्ये आत मध्ये बाधन्यात आलेल्या चार शेळ्या अनेक कोंबडी रासायनिक खतांच्या बैग व २० पिव्हि सी पाईप एक एकर चे थिबक बंडल शेतीला लागनारी लाकडी ओत व शेती अवजारे तसेच साठून ठेवलेला गहु ज्वारी जळून खाक झाल्याची माहिती आहे . बातमी लिहोस्रतर कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली नसल्याची माहिती आहे.