Home जळगाव किलबिल अकँडमीत स्नेह संमेलन संपंन्न…!!

किलबिल अकँडमीत स्नेह संमेलन संपंन्न…!!

31
0

रावेर (शरीफ शेख)

रावेर येथील विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान, दिल्ली संलग्नित व यशवंत प्रतिष्ठान रावेर संचलित किलबिल अकॅडमी रावेर चे स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात पार पडले चिमुकल्या बाळगोपाळांचा उत्साह व त्यासोबतच त्यांच्या पालकांचाही उत्साह सम्पूर्ण वातावरण मंगलमय करत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ रंजना प्रल्हाद पाटील होत्या,कार्यक्रमाच्या उद्दघाकट व प्रमुख वक्त्या माननीय डॉ.सौ.मधूश्री संजीव सावजी,( विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान देवगिरी प्रांत अध्यक्ष व अखिल भारतीय मंत्री) तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री.प्रकाशजी भिवसन पोतदार प्रांत मंत्री देवगिरी प्रांत व मा.श्री.लखमसी देवजी पटेल माननीय तालुका संघचालक रावेर (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) हे होते.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बालगीत,देशभक्तीपर गीते, नाटिका, गीतगायन पोवाडा, नृत्य अश्या विविध कलागुणांचे सादरीकरण केले.
विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी शाळेत घेण्यात आलेल्या विविध
स्पर्धांमधील विजयी विद्यार्थ्यांना तसेच पालकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या प्रधानाचार्या सौ नयना निलेश पाटील,
सुत्रसंचालन व आभार सौ जयश्री रमेश पाटील यांनी मानले. या वेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Unlimited Reseller Hosting