Home महत्वाची बातमी निमणी येथे नाली बांधकाम भूमिपूजन सोहळा

निमणी येथे नाली बांधकाम भूमिपूजन सोहळा

184

मनोज गोरे – कोरपना

तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या निमणी येथील वॉर्ड क्रमांक ३ रमेश गोरे ते धूनकी रोड नाली बांधकाम भूमिपूजन सोहळा सरपंच सीमा जगताप यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी उपसरपंच उमेश राजूरकर ग्रामसेवक रवी बोढे निलेश बोनगीनवार ग्रामपंचायत सदस्या गिरजाबाई गोबाडे निलेश बोनगीनवार शुद्धोधन जगताप मनोज धोटे आनंदराव दिवसे देवराव नगराळे गजानन गोबाडे मनोहर गौरकर रवींद्र बोढे आदी उपस्थित होते
वॉर्ड नं ३ येथील नागरिकांना पावसाळ्यात पावसाचे पाणी त्यांच्या घरात शिरत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायत निमणी कडून चौदावा वित्त आयोग निधी अंतर्गत ३ लाख रुपये मंजूर करून बांधकाम सुरू केले आहे.
नाली बांधकाम सुरू करण्यात आल्याने वॉर्ड क्रमांक ३ येथील नागरिकांना सोयीचे होणार असल्याने नागरिकांनी ग्रामपंचायतचे आभार मानले.