Home सोलापुर वागदरी येथे एकाच रात्री ९  दुकान व घर फोडी.जैन मंदिरातील गल्ल्वर डल्ला.

वागदरी येथे एकाच रात्री ९  दुकान व घर फोडी.जैन मंदिरातील गल्ल्वर डल्ला.

523

वागदरी / नागप्पा आष्टगी

अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे दि.२९ मध्यरात्री चोरानी हौदास घातले असुन ४ दुकान व पाच घरांची कुलुप तोडून लाखो रू.चोरी केले आहे.त्या मुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.या बाबत अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

या बाबत माहिती अशी की,दि.२९ रोजी मध्यरात्री एक च्या सुमारास अद्यात चोरांनी वागदरी बाजार पेठेतील प्रकाश शिवपुत्र शिरगण यांच्या मालकीचे कापड दुकानाची कुलुप तोडून ३० साडी ,१५ जीन पँड चोरून नेले आहे.त्या नंतर कालीका ज्वेलर्स दुकानाची कुलुप तोडले.सुदैवाने काहीच हाती लागले नाही.सुनंदा कलशट्टी याच्या बंद घराची कुलुप तोडून ३ भारी किमंतीची साड्या व रोख १५०० घेवुन मोर्चा पुडील घराकडे वळविले आहे.संतोष सावंत यांच्या घरातील दोन तोळे सोन्याचे दागिने,रोख पाच हजार रू व साड्यावर ताव मारले आहे.
वागदरी येथील पुरातन जैन मंदिरात मोठी चोरी करण्याचा प्रयत्न फसला असला तरी गल्ला पेटी फोडुन १० हजार रू पळविले आहे.मेन गाभा-यांची कुलुप तोडू शकले नाही.त्या मुळे मोठा अनर्थ टाळला आहे.त्या नंर परमेश्वर ढोपरे,विरभद्र मुनोळी यांचे किराणा दुकानाचे कुलुप फोडले आहे.त्यात त्याचा मोठा नुकसान झाले नाही.वागदरी येथील एस एस शेळके प्रशालेतील शिक्षिका चिंचोळी मँडम यांच्या घरा समोरील गाडी शाईन चोरले आहे. शुभांगी शिदे व महादेव सोनकावडे यांच्या घराची कुलुप तोडले आहे.किरकोळ चोरी झाली आहे. या बाबत उत्तर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असुन पोलिस हवालदार अजय भोसले,अरूण राऊत अधिक तपास करीत आहेत. या वेळी तंटामुक्त अध्यक्ष राजकुमार यादव ,माजी अध्यक्ष रतन बंगारगी ,राम सकट, ग्रा प सदस्य सुनिल सावंत आदी उपस्थित होते. दि.२७ व २८ रोजी किरन