Home जळगाव “संविधान बचाव नागरी कृती समितीच्या वतीने महाराष्ट्राचे गृहमंत्री ना.श्री अनिल देशमुख यांना...

“संविधान बचाव नागरी कृती समितीच्या वतीने महाराष्ट्राचे गृहमंत्री ना.श्री अनिल देशमुख यांना निवेदन”

86
0

रावेर (शरीफ शेख)

“संविधान बचाव नागरी कृती समितीच्या वतीने महाराष्ट्राचे गृहमंत्री ना.श्री अनिल देशमुख यांना निवेदन”

महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांना निवेदन देवून भुसावळ येथे पोलिसांनी २९ जानेवारी रोजी झालेल्या बंद च्या पार्श्वभूमीवर झालेल्या तणावात व दगड फेकीत निष्पाप लोकांना दबावात घेणे ,रात्री बे रात्री आरोपी असल्या च्या नावाने कोणाच्या तरी दबावाला बळी पडून सतत कार्यवाही केली जात आहे . संविधान बचाव नागरी कृती समिती च्या भुसावळ शाखेने वेळे वेळी पोलिसान बरोबर चर्चा करत न्याय मागण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस प्रशासना कडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद दिला जात नव्हता उलट कुठलीही गंभीर जखम नसतांना ३०७ व ३५३ सारखे कलम लावून निष्पाप मुलाना आरोपी करण्यात आले आहे ह्या विरुध्द गृहमंत्री ना.श्री अनिल देशमुख यांच्या कडे जावून निवेदन दिले असून त्या वेळी राष्ट्रवादीच्या आ. विद्या चव्हाण, समाजवादी पार्टीचे आ.अब्बु आझमी व लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे व संविधान बचाव नागरी कृती समिती चे इम्रान खान हे उपस्थित होते ह्या वेळी ना.श्री अनिल देशमुख यांनी पोलिस अधीक्षक यांच्या शी चर्चा करून न्याय देण्याचे आश्वासन दिले.