Home मराठवाडा नांदेड येथे केळी पिकांमधील अन्नद्रव्य व्यवस्थापन विषयी चर्चासत्र संपन्न

नांदेड येथे केळी पिकांमधील अन्नद्रव्य व्यवस्थापन विषयी चर्चासत्र संपन्न

480

नांदेड , दि. २९ – ( राजेश भांगे ) –
केळी पिकामधील जाचक पॅटर्न (जोड ओळ पद्धत) चे विख्यात मा. कपिल जाचक हे २४ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधी मध्ये नांदेड येथे केळी बागायतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. श्री.कपिल जाचक एक प्रगतशील केळी बागाईतदार आहेत. यांच्या समवेत याराचे ऍग्रोनॉमिस्ट मा. विकास खैरनार यांनी देखील शेतकऱ्यांना पीक अन्नद्रव्य व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले. या दौऱ्यामध्ये याराने बारड ता.मुदखेड,बसवेश्वर मंदिर लहान ता.अर्धापूर, दांडेगाव,ता. कळमनुरी जि. नांदेड,जठा शंकर मंदिर,डोंगरकडा,ता.कलमनुरी जि.हिंगोलीं,गिरगाव,ता.वसमत,जि हिंगोली या ठिकाणी चर्चासत्राचे आयोजन केले होते. परभणी,नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांमधून ६०० पेक्षा अधिक केळी बागायतदार शेतकऱ्यांनी या चर्चासत्राचा लाभ घेतला.
या चर्चासत्रांमध्ये केळी पिकामधील काही महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
o केळी पिकामधील प्रमुख समस्या.
o केळी पिकामधील अन्नद्रव्य व्यवस्थापन.
o केळी मध्ये खोडवा/पिलबाग खत व्यवस्थापन.
o सरासरी केळीची रास/वजन ३०-३५ किलो कधी आणि त्यासाठी खत व्यवस्थापण कशा प्रकारे करावे.
o केळीमध्ये पिल कधी राखावे? एकदा केळी लावल्यानंतर किती खोडवे/ पिलबाग घ्यावेत.
o केळी पिकामधील जोड ओळ पद्धत म्हणजेच जाचक पॅटर्न संबंधी माहिती.
चर्चा सत्राबरोबरच नारायण गोरे पाटील, दांडेगाव आणि अविनाश बादलवड, लहान,तालुका-अर्धापूर यांच्या येथे प्लॉट व्हिसिट देखील करण्यात आली. त्यामध्ये गावातील प्रमुख प्रगतशील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये कपिल जाचक यांनी जोड ओळ पद्धत त्याचबरोबर ,पाणी व्यवस्थापन, अन्नद्रव्य ,लागवडीच्या पद्धती आणि खोडवा पीक याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
नांदेड चे शेतकरी म्हणाले की याराच्या चर्चासत्रामुळे आम्हाला केळी पिकाविषयी खूप चांगले मार्गदर्शन लाभले आणि अशा प्रकारचे चर्चासत्र वेळोवेळी व्हावे ज्याचा फायदा आम्हाला उत्पादन वाढीमध्ये निश्चित होईल. परभणीच्या शेतकऱ्यांनी असे चर्चासत्र त्यांच्या भागामध्ये देखील आयोजित करावे अशी इच्छा व्यक्त केली.
या चर्चासत्राचे आयोजन याराचे एरिया सेल्स मॅनेजर रत्नराज काळे आणि अक्षय देशमुख यांनी केले होते.