Home मराठवाडा पर्यटन विकास योजने अंतर्गत पर्यटन मंत्रींकडे घुंगराळा येथील विकास कामांसाठी निधीची मागणी

पर्यटन विकास योजने अंतर्गत पर्यटन मंत्रींकडे घुंगराळा येथील विकास कामांसाठी निधीची मागणी

156

नांदेड , दि.२९ ; ( राजेश भांगे ) ;-
पर्यटन विकास योजनेअंतर्गत घुंगराळा या गावातली विकासकामांसाठी निधी मंजूर करावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी पर्यटन राज्यमंत्री कु.अदिति ताई तटकरे यांच्याकडे केली. – नायगांव ( बा ) तालुक्यातील नांदेड ते हैदराबाद राज्य महा मार्गा वरील घुंगराळा येथे डोंगरावर प्राचीन असे खंडोबा देवाचे मोठे मंदीर आहे. -या मंदिराचा लोक वर्गणीतुन एक कोटी रुपयांचे बांधकाम करून जिर्णोधार केला आहे. –या मंदीर परिसराच्या विकासकामांसाठी पर्यटन विभागाच्या पर्यटन विकास निधीतुन संरक्षक भिंत बांधकाम, सभामंडप, मंदीर मार्गावर व परिसरात विद्युतिकरन , सार्वजनिक शौचालय या कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी पर्यटन राज्यमंत्री अदिती ताई तटकरे यांच्याकडे केली.
वरिल विकास कामे झाल्यास हे खंडोबा देवाचे मंदिर नांदेड़ जिल्ह्यातील पर्यटन स्थळ म्हणून नावारुपास येईल. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेशकार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या उपस्थीत हे निवेदन देण्यात आले यावर मंत्री महोदयांनी निधी मंजूर करू असे सांगितले.