Home विदर्भ अबब…!कोरपना तहसील कार्यालयातून रेती जप्तीचा ट्रक गेला चोरी.

अबब…!कोरपना तहसील कार्यालयातून रेती जप्तीचा ट्रक गेला चोरी.

53
0

पोलिस ठाण्यात तक्रार दाखल ,शोधमोहीम सुरू

कोरपना – मनोज गोरे

कोरपना तालुक्यातील विविध घाटातून अहोरात्र मोठ्याप्रमाणात वाळू चोरीच्या घटना वाढल्याने शासनाच्या तिजोरीला लाखोंचा चुना लागत आहे.याची माहिती असतानही महसूल विभाग याकडे कमालीचे दुर्लक्ष करीत असल्याची बोंब सुरू असून यामुळे विविध स्तरांतून तहसीलदार यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.असे असताना दोन दिवसापुर्वी वाळु वाहतुक करणाऱ्या एका ट्रकला तहसीलदारांनी पकडून तहसील कार्यालयात आणुन जप्त केले.मात्र २४ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास तो जप्ता केलेला ट्रक चोरी गेल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून यासंबंधीची तक्रार कोरपना पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. ठाणेदारांनी एक पथक तयार करून शोधमोहीम सुरू केली असून तेलंगणा राज्यातील आदिलाबाद-हैद्राबाद मार्गाने हे पथक रवाना केल्याची माहिती ठाणेदार गुरनुले यांनी News34 प्रतिनिधीला दूरध्वनीवरून दिली आहे.लवकरच ट्रकचा शोध लावण्यात येईल असे आश्वासन ठाणेदारांनी दिले आहे.यासर्व घडामोड लक्षात घेता कोरपना तालुक्यातील विविध घाटावरून कशाप्रकारे वाळु उत्खनन करून तस्करी केली जात आहे याची कल्पनाच न केलेली बरी.कोरपना येथे नवीन तहसीलदारच्या आगमनानंतर तालुक्यात मोठ्याप्रमाणात वाळु चोरीच्या घटनात वाढ झाल्याची चर्चा नागरिकांत सुरू असून संबंधित विभाग अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देऊन ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत जनतेकडून व्यक्त होत आहे.