Home विदर्भ लोकसेवक स्व.तुषार पुंडकर यांना सर्वपक्षीय व विविध सामाजिक संघटनांकडून भावपूर्ण श्रद्धांजली…

लोकसेवक स्व.तुषार पुंडकर यांना सर्वपक्षीय व विविध सामाजिक संघटनांकडून भावपूर्ण श्रद्धांजली…

184

देवानंद खिरकर – अकोट

अकोला , दि. २६ :- अकोट शहरातील स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी पार्क येथे लोकसेवक तथा प्रहार चे जिल्हाध्यक्ष स्व.तुषार पुंडकर यांना सर्वपक्षीय तथा विविध सामाजिक संघटनांकडून सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.महाशिवरात्री च्या दिवशी प्रहार नेते स्व.तुषार पुंडकर यांच्या वर काही समाजकंटकांनी गोळीबार करून त्यांची हत्या घडविली.स्व.तुषार पुंडकर हे अकोट मधील सर्वसामान्य,गोरगरीब,लोकांचे आधारस्तंभ होते त्यांनी अल्पावधीतच जिल्ह्यात आपली एक वैचारिक आंदोलक युवानेता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती यासोबत ते तरुणाईच्या गळ्यातील ताईत होते.त्यांच्या जाण्याने आज अकोट शहर तालुक्यात कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.या श्रद्धांजली कार्यक्रमाला जिल्हातील सर्व पक्षीय नेत्यांनी आपली उपस्थिती लावत स्व.तुषार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आपल्या शब्दरूपी संवेदना व्यक्त केल्या.यावेळी प्रामुख्याने जेष्ठ समाजसेवक काँग्रेस नेते अभय दादा पाटील,मा.आमदार संजय गावंडे,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा सहकार नेते नानासाहेब हिंगणकर,जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष हिदायत पटेल,भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे,,ऍडव्होकेट गांधी,शेतकरी संघटनेचे लक्ष्मीकांत कौथकर,माजी जि.प.सदस्य बाळासाहेब बोन्द्रे,प्रहार नगरसेवक मनोज पाटील,सुरेश सेठ अग्रवाल,काँग्रेस नेते डॉ.चोरे,प्रशांत दादा पाचडे,डॉ.गजानन महल्ले,मनोज दादा खंडारे,संभाजी ब्रिगेड चे प्रदीप चोरे,राष्ट्रीय समाज पक्षाचे सतीश हांडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित नेते तसेच विविध सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खालीलप्रमाणे आपल्या श्रद्धांजलीपर शब्दरूपी संवेदना व्यक्त केल्या.

▪ *ज्येष्ठ समाजसेवक तथा काँग्रेस नेते अभय दादा पाटील -* स्व.तुषार पुंडकर हा समाजासाठी अहोरात्र झटणारा होता.त्यांचा विचार त्याच्या सारख कार्य करून समाजात रुजू द्या व तो विचार सर्वांनी जिवंत ठेवा हिच खरी श्रद्धांजली…

▪ *माजी आमदार संजय गावंडे* – तुषार च्या जाण्याने शेतकरी शेतमजूर व अपंग बांधवांचे अतीव नुकसान झाल्याचे मत व्यक्त केले.

▪ *नानासाहेब हिंगणकर (जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा सहकार नेते)* – कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीला न्याय देणारा तथा आक्रमक आंदोलन करणारा युवा नेता आपल्यातून गेल्याच दुःख आहे.

▪ *हिदायत पटेल (जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष)* – स्व.तुषार पुंडकर यांनी स्वकर्तुत्वाने पदे मिळविली व जिल्ह्यात मोठी तरुणांची प्रहार संघटना उभी केली.

▪ *प्रदीप वानखडे (भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष)* – मनाला चटका लावणारा हा दुःखद प्रसंग असून रक्तदान चळवळीतुन समाजसेवा करणारा युवा कार्यकर्ता गेला आहे.

▪ *दिलीप बोचे (शिवसेना उपजिल्हाप्रमुख)* – अकोट शहरात कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली परंतु स्व.तुषार आपल्यामध्ये त्यांच्या निरंतर केलेल्या समाजपयोगी प्रेरणादायी कार्यरूपी सदैव राहतील.

▪ *ऍड.ब्रिजमोहन गांधी (मा.नगराध्यक्ष)* – प्रहारचा गड आला पन सिंह गेला.

▪ *सुरेशसेठ अग्रवाल* – सर्वांवरप्रेम करणारा,सर्वाचा आदर करणारा कार्यकर्ता गेला.

▪ *लक्ष्मीकांत कौथकर (शेतकरी संघटना)* – जनकल्याण आंदोलनाची शृंखला रचणारा कार्यकर्ता आपल्यातून गेला.

▪ *बाळासाहेब बोन्द्रे (मा.जि.प.सदस्य) -* सर्व जाती धर्माचा चाहता गेला.

▪ *सतिष हांडे (राष्ट्रीय समाज पक्ष) -* चळवळीतील कार्यकर्ता गेला.

▪ *प्रदीप चोरे (संभाजी ब्रिगेड)* – खंदा कार्यकर्ता समाजाने गमावला

▪ *मनोज पाटील (नगरसेवक प्रहार) -* स्व.तुषार पुंडकर वाघासारखा फिरायचा. तुषारच्या विचारांचा वारसा संपविणे हाच मारेकरांचा उद्देश असल्याचे सांगितले.

▪ *मनोजदादा खंडारे* – जीवाचे रान करणारा शेतकऱ्यांचा साथी गेला.

▪ *डॉ.गजनन महल्ले* – तुषार पुंडकर यांच्या गेल्याने शहरात भयाण अस्वस्थता पसरली आहे.

▪ *प्रशांतदादा पाचडे* – अतिशय दुःखद घटना आहे.लहान वयापासून समाजसेवा करणारा ते जिल्हा नेता अशी ओळख निर्माण करणारा कार्यकर्ता गेल्याचे दुःख आहे.

▪ *डॉ.चोरे (काँग्रेस नेते)* – वंचित घटकांना न्याय देणारा कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला.

यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे यांनी आपल्या परखड संवेदना व्यक्त करतांना सांगितले की यावेळी शासनाने आमचा अंत पाहू नये मारेकऱ्यांना तात्काळ शोधून शिक्षा करावी.पोलीस कारवाई वर बारीक लक्ष ठेवल्या जात असून तपासात कुठेही कमजोरी आल्यास सर्वांनी मिळून दबाव आणून मारेकरी पकडण्यासाठी यंत्रणेला भाग पाडू त्यासाठी कधीही हाक मारा मदतीसाठी आम्ही सर्व तयार राहू.

यावेळी उपस्थितांमध्ये नगर सेवक मनिष कराळे नगरसेवक विवेक बोचे,शिवसेना तालुका प्रमुख शाम गावंडे कैलासभाऊ गोंडचवर,बंडूभाऊ कुलट,शंकरराव चौधरी,दयाराम पाटील धुमाळे,शेतकरी संघटनेचे विक्रांत बोन्द्रे,माजी सभापती पांडुरंग तायडे,माजी जि.प.सदस्य किशोर वडतकर,अशोकराव गावंडे,मराठा सेवा संघाचे अविदादा डीक्कर,प्रवीण वानखडे,शरद पांडे,संतोष इंगळे,आदीवासी संघटनेचे संतोष सोळंके,लोकजगर मंचचे गजाननराव बोरोकार,संजय भट्टी,नगरसेवक चेतन मर्दाने, भारिप बहुजन महासंघाच्या सुनीताताई वानखडे,मंदाताई कोल्हे,सिद्धेश्वर बेराड माजी नगरसेवक,निखिल ठाकरे,प्रा. बोबडे सर,छोटू उर्फ श्रीजित कराळे,,माजी सरपंच मनीष कोकाटे,सरपंच दत्ता पाटील ओलंबे,भाजप माजी तालुकाध्यक्ष राजूभाऊ रावनकार,सरपंच अविभाऊ गावंडे,सरपंच विलासराव साबळे,विजय ढेपे, महादेव सातपुते,प्रहार चे निखिल गावंडे,कुलजीत वसू,मुन्ना साबळे,रोशन पर्वतकर,निखिल तापडिया,योगेश सावरकर,प्रवीण डीक्कर यांच्यासह शेकडो युवातरुण हितचिंतक अकोट वासी उपस्थित होते.श्रद्धांजली कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.