Home महाराष्ट्र राज्यात ७२ हजार पदांच्या मेघाभरतीला सुरवात

राज्यात ७२ हजार पदांच्या मेघाभरतीला सुरवात

66
0

नांदेड , दि, १८ :- ( राजेश भांगे ) राज्यात गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या भरती प्रक्रियेला महाविकास आघाडीने हिरवा कंदील दाखवला आहे.

राज्यभरात ७२ हजार पदांच्या महाभरतीला सुरवात झाली आहे.* ही भरती प्रक्रिया महापरीक्षा पोर्टलद्वारे न होता. प्रत्येक विभाग स्तरावर करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. अशाप्रकारे फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या महाभरतीला महाविकास आघाडीने मूर्त स्वरुप दिले आहे.

गृह, पाणी पुरवठा, शिक्षण, सामाजिक न्याय, महसूल, आरोग्य, पशुवसंर्धन यासह अन्य विभागांकडून रिक्‍त पदांची माहिती संकलित करण्यात आली आहे.राज्यातील विविध विभागांमध्ये सद्यस्थितीत पावणेदोन लाख रिक्‍त पदे आहेत. राज्याची आर्थिक स्थिती पाहता पहिल्या टप्प्यात ७० ते ७२ हजार पदांची भरती केली जाणार आहे.

त्यासाठी राज्यसरकारला दरवर्षी सुमारे आठ ते साडेआठ हजार कोटींचा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. तसेच महापरीक्षा पोर्टलबाबत विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारी आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी उठवलेल्या आवाजामुळे हे पोर्टल बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शासनाच्या वतीने पोर्टलबाबत विद्यार्थ्यांकडून अभिप्राय मागविण्यात आले होते. त्यामध्येही तब्बल ८५ टक्‍के विद्यार्थ्यांनी पोर्टल बंद करावे, अशी मागणी केली होती.