Home महत्वाची बातमी डॉक्टर ने केला रुग्ण तरुणीचा विनयभंग

डॉक्टर ने केला रुग्ण तरुणीचा विनयभंग

105
0

सर्वत्र खळबळ…!!

अमीन शाह

नांदेड , दि. १६ :- त्वचेची समस्या असल्याने उपचार घेण्यासाठी शहरातील आंबेडकर चौक परिसरातील एका खासगी रुग्णालयात गेलेल्या वीस वर्षीय आदिवासी तरुणीचा डाॅक्टरने विनयभंग केल्याची घटना घडली. या प्रकरणी पिडित तरुणीच्या फिर्यादीवरून रात्री उशीरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.गुन्हा नोंदविण्या पूर्वि पोलिस ठाण्यात आलेल्या आरोपिस गुन्हा नोंदविण्याची चाहुल लागल्याने आरोपी डॉक्टर फरार झाला आहे.
या प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून डॉक्टर विरुद्ध विविध कलमान्वये तसेच अॅट्रासीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किनवट तालुक्यातील थारा येथील आदिवासी समाजाची तरुणी पेटकुले नगर, गोकुंदा येथे भाड्याच्या खोलीत राहून गोकुंदा येथीलच एका अकॅडमीत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण घेत आहे.त्वचेची समस्या असल्याने पीडित वीस वर्षीय तरुणीचे शहरातील नागरगोजे रुग्णालयात उपचार चालू होते. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ती तरुणी आपल्या एका मैत्रिणीसोबत रुग्णालयात गेली असता डॉ. नागरगोजे यांनी तरुणीच्या मैत्रिणीस कॅबिन बाहेर पाठवून, पीडितेचा हात हातात घेऊन फ्रेंडशिप करण्यास सांगीतले व मिठी मारून विनयभंग केला.

याबाबतची फिर्याद पीडित तरुणीने किनवट पोलिस ठाण्यात दुपारीच दिली. त्यावरून आरोपी डॉक्टर विरुद्ध विनयभंग व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अट्रोसिटी कायद्यानुसार रात्री उशीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक हे करीत आहेत.

Unlimited Reseller Hosting